अलिबाग : ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियम-२०१५’चे प्रारुप बुधवारी गृह विभागाचे अवर सचिव प्र. गं. घोक्षे यांनी www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर टाकले. त्यावर हरकती आणि सूचना करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. राज्यातील, विशेषत: सामाजिक बहिष्काराने पोळलेल्या भागांतील रहिवाशांकडून आणि या क्षेत्रात कार्यरत सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांकडून हरकती व सूचना येणे अपेक्षित आहे. त्यामुळे हा कायदा परिपूर्ण होऊ शकेल. हरकती व सूचना येत्या दोन आठवड्यांत अवर सचिव (विशा-६), गृह विभाग, मंत्रालय, दुसरा मजला, मादाम कामा रोड, मुंबई-४०००३२ या पत्त्यावर येथे तसेच home_special6@ maharashtra.gov.in या ईमेलवर नोंदवता येतील, असे जाहीर करण्यात आले आहे.येत्या हिवाळी नागपूर अधिवेशनात ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियम-२०१५’हा कायद्यास मंजुरीकरीता ठेवण्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. (विशेष प्रतिनिधी)
बहिष्कृत कुटुंबांसाठी आशेचा किरण
By admin | Published: November 19, 2015 1:50 AM