शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

बॅँकांना दिलेल्या नोटांचा तपशील देण्यास ‘आरबीआय’चा नकार

By admin | Published: January 02, 2017 6:56 AM

केंद्र सरकारने ५०० व हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर, बॅँकांना पुरविण्यात आलेल्या नोटांची माहिती जाहीर करण्यास रिझर्व्ह बॅँक आॅफ

मुंबई : केंद्र सरकारने ५०० व हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर, बॅँकांना पुरविण्यात आलेल्या नोटांची माहिती जाहीर करण्यास रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाने (आरबीआय) नकार दिला आहे. त्यामुळे व्यक्तीच्या जीविताला आणि शारीरिक सुरक्षेला धोका निर्माण होईल, असे कारण देत, त्याबाबत काहीही तपशील देण्यास असर्मथता दर्शविली आहे. त्यांचे हे मौन संशयास्पद असून, जनतेला याबाबतची माहिती मिळविण्याचा अधिकार आहे, असा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.८ नोव्हेंबरपासून देशात नोटाटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयानंतर नागरिकांच्या सोयीसाठी बॅँकांना चलनात येणाऱ्या किती नोटा पुरविण्यात आल्या? याची माहिती गलगली यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये आरबीआयकडे मागितली होती. मात्र, त्याबाबत काहीही सांगण्यास स्पष्ट नकार देत, बॅँकेचे केंद्रीय जनमाहिती अधिकारी पी. विजय कुमार यांनी कळविले की, संबंधित माहितीमुळे व्यक्तीच्या जीविताला आणि शारीरिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच सुरक्षा प्रयोजनासाठी विश्वासपूर्वक दिलेल्या माहितीचा स्रोत किंवा केलेले सहाय्य ओळखता येईल, त्यामुळे ही माहिती उपलब्ध करून देता येत नाही.अनिल गलगली यांनी आरबीआयच्या हा दावा चुकीचा असल्याचा आरोप करत, या आदेशाविरुद्ध प्रथम अपील दाखल केले आहे. नोटाबंदीच्या दरम्यान, सरकारी बॅँकांच्या तुलनेत काही खासगी बँकांना जास्त रक्कम पुरविली गेली. नोटांची अदलबदल आरबीआयने निश्चित केलेल्या प्रमाणाहून अधिक झाली आहे. त्यामुळे काही लोकांकडे मोठ्या प्रमाणात नवीन चलन मिळाले. नोटाबंदीमुुळे सामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने, ही माहिती सार्वजनिक करण्यात अधिक लोकहित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)