लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा वाहनांची संख्या वाढल्याने बोरघाटात अमृतांजन पुल ते आडोशी बोगदा दरम्यान वाहतुक कोंडी झाली आहे. त्यातच सकाळी साडेआठच्या सुमारास खंडाळा बोगद्या जवळील बँटरीहिलच्या चढणीवर दोन अवजड वाहने बंद पडल्याने वाहतुक कोंडीत भर पडली होती. खंडाळा महामार्ग पोलीस व आयआरबी कर्मचार्यांनी तातडीने ही वाहने बाजुला करत वाहतुक खुली केली असली तरी आडोशी बोगदा ते अमृतांजन भागात वाहनांची संख्या वाढल्याने झालेल्या वाहतुक कोंडीमुळे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात आजही कोंडी कायम आहे. सलग सुट्टयांमुळे कालपासून (शनिवार दि.१३) खंडाळा बोरघाटात वाहतुक कोंडी आहे. मुंबई पुणे हा प्रवास जलदगतीने व्हावा याकरिता निर्माण केलेला मुंबई पुणे हा द्रुतगती मार्ग वाहनांची संख्या वाढल्याने कासवगती होऊ लागला आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा वाहतुक कोंडी
By admin | Published: August 14, 2016 9:24 AM