शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

५७ हजार विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले

By admin | Published: August 26, 2015 1:44 AM

दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-आॅगस्ट २०१५ मध्ये पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या

पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-आॅगस्ट २०१५ मध्ये पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला. एकूण निकाल २५.३७ टक्के लागला असून, ३५ हजार ३४६ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल ५७ हजार ५१७ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचले, तर एकूण १ लाख ७ हजार २६ विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.उत्तीर्ण झालेल्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर चालू शैक्षणिक वर्षात आॅफलाइन पद्धतीने प्रवेश घेता येईल. त्यासाठी नजीकच्या जागा रिक्त असलेल्या महाविद्यालयांत जाऊन प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल. ३१ आॅगस्टला दुपारी ३ वा. गुणपत्रिकांचे वाटप होणार असून, ३१ आॅगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान गुणपडताळणीसाठी अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी २५ आॅगस्ट ते १४ सप्टेंबरदरम्यान अर्ज करता येईल.५७ हजार ५१७ विद्यार्थ्यांना फायदा !राज्यातील १ लाख ४० हजार १२१ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यातून परीक्षा देणाऱ्या १ लाख ३९ हजार ३२९ विद्यार्थ्यांपैकी ३५ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. फेरपरीक्षेमुळे दुसरी संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ४० हजार ३३४ विद्यार्थी केवळ एका विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत.दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३१ हजार ३४६ इतकी आहे. त्यामुळे एकूण पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ७ हजार २६ विद्यार्थी इतकी आहे.एकूण विद्यार्थ्यांमधील ४९ हजार ५०९ विद्यार्थी मार्च २०१५ साली झालेल्या परीक्षेत एटीकेटीनुसार अकरावीसाठी पात्र झाले होते. परिणामी जुन्या पात्र विद्यार्थ्यांची संख्या वगळली असता एकूण ५७ हजार ५१७ विद्यार्थ्यांना नव्या नियमाचा फायदा झाला आहे.‘लोकमत’लाही श्रेयकर्नाटकात दहावी, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तातडीने फेरपरीक्षा होते, हे ‘लोकमत’ने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास आणून देत त्याचा पाठपुरावाही केला होता. त्यावर तावडे यांनी १५ दिवसांत फेरपरीक्षेचा निर्णय जाहीर केला होता.मार्चमध्येच परीक्षाविद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या हेतूने आॅक्टोबर महिन्याऐवजी जुलै-आॅगस्ट महिन्यात दहावीची परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे पुन्हा आॅक्टोबर महिन्यात परीक्षा घेतली जाणार नाही. परिणामी, विद्यार्थ्यांना मार्च २०१६मध्ये होणारी दहावीची परीक्षा द्यावी लागणार आहे.विभागनिहाय निकाल मंडळनोंदविलेलेउत्तीर्णटक्केवारीमुंबई३२,७३२५,८००१७.८४पुणे१९,०१५४,९४०२६.२०नागपूर१६९४१५२६६३१.२०औरंगाबाद१७०३५४६८८२७.६५कोल्हापूर९४९३२०६३२१.८०अमरावती१७६८८५७८०३२.८०नाशिक१२८३८३२४७२५.४९लातूर१३००४३३९३२६.२०कोकण१३७५१६९१२.५३ज्या जिल्ह्यांत अकरावीच्या जागा कमी आहेत, तेथील जागा पाच टक्क्यांनी वाढविण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत समुपदेशन करण्यात येईल. - विनोद तावडे, शिक्षणमंत्री