भाष्यकवितेमध्ये घटना आणि त्यावरील मार्मिक टिपण्णी केलेली असते. राजकीय पक्ष, व्यक्ती, झेंडे बदलतात, सत्तेची प्रवृत्ती मात्र बदलत नसते. हे बारकावे तीक्ष्ण दृष्टीने टिपणे आवश्यक असते. बोलीभाषा हे भाष्यकवितेचे बलस्थान आहे. भाष्यकवितेमध्ये क्लिष्ट लेखन करुन चालत नाही. वाचनातून ज्ञान मिळवून लेखन करताना कवीने तटस्थ आणि त्रयस्थ असणे गरजेचे असते. तरच, लेखणीला धार येते, असे मत वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. भाष्यकविता करताना राजकारणाचा बारकाईने अभ्यास करुन, वाचन करुन मुळे शोधली पाहिजेत. कोणताही राजकीय पक्ष सत्तेवर आला तरी सत्तेबाबत सर्वांची प्रवृत्ती सारखीच असते. टोपी बदलली म्हणून समाजात बदल घडत नसतात. राजकीय पक्ष, व्यक्ती, झेंडे बदलतात, सत्तेची प्रवृत्ती मात्र बदलत नसते. हे बारकावे तीक्ष्ण दृष्टीने टिपणे आवश्यक असते. सत्ताधा-यांना झोडपणे, हेच कवीचे काम असते. बोलीभाषा हे भाष्यकवितेचे बलस्थान आहे. भाष्यकवितेमध्ये क्लिष्ट लेखन करुन चालत नाही. सर्वसामान्यांना भाष्यकवितेचा अर्थ पटकन उलगडला पाहिजे. अनेक तरुण भाष्यकवितेच्या क्षेत्रात पाय रोवू पाहत आहेत. त्यांच्यासाठी कार्यशाळा घेणे गरजेचे आहे. यमक जुळवणे म्हणजे कविता नव्हे. भाष्यकविता करण्याआधी शिवाजी, शाहू, फुले, आंबेडकर वाचले पाहिजेत. आजकाल तरुण वाचन करत नाहीत आणि थेट लेखणी हातात घेतात. अशा प्रकारचे लेखन द्वेषातून किंवा विशिष्ट विचारसरणीतून केले जाऊ शकते. त्यामुळे वाचनातून ज्ञान मिळवून लेखन करताना कवीने तटस्थ आणि त्रयस्थ असणे गरजेचे असते. तरच, लेखणीला धार येते. भाष्यकवितांमध्ये व्यंगचित्रांप्रमाणे सामर्थ्य असते. व्यक्तीचे नाव न घेता घटनांवर भाष्य करणे, हा त्यामागचा उद्देश असतो. अग्रलेखाचा विषय भाष्यकवितेमध्ये चार ओळींमध्ये मांडता येतो. पहिल्या दोन ओळींमध्ये घटना आणि दुस-या दोन ओळींमध्ये चिमटा काढता येतो. भाष्यकवितेतील ओळी धारदार असतील तरच त्यातील परिणामकारकता साधली जाते. भाष्यकविता अथवा वात्रटिकेतील ओळी वाचक दोन मिनिटांमध्ये वाचतात. पण विचार करुन, २०-२५ वेळा लेखन करावे लागते. त्यासाठी वाचन, अभ्यास, चिंतन, शब्दसामर्थ्य अत्यंत महत्वाचे असते. नावे बदलतात, सत्तेचा खेळ तोच!अभिजात कवितेचा आनंद पुस्तकातून एकट्या व्यक्तीला घेता येतो. मात्र, भाष्यकवितेचा आनंद समूहाने लुटता येतो. सोशल मीडियामुळे भाष्यकविता अथवा कोणतेही लेखन कमी वेळात अनेक वाचकांपर्यंत पोचते आणि उत्तम प्रतिसादही मिळतो. मात्र, प्रत्येक माध्यमाच्या चांगल्या-वाईट बाजू असतात. त्याप्रमाणे सोशल मीडियालाही काही मर्यादा आहेत. सत्तेचा खेळ महाभारतापासून सुरु आहे. १०० वर्षांनंतरही तो कायम राहणार आहे. प्रत्येकाची अस्तित्वाची लढाई सुरु असते. सत्तेच्या आड येणारे पत्रकार, साहित्यिक, कलाकार, स्वत:च्याच पक्षातील लोक यांना सोयीस्कर पध्दतीने बाजूला केले जाते. नावे बदलतात, पण हा खेळ साततत्याने सुरु राहतो, असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.आपल्या देशामध्ये जातीवाद फोफावला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्राम्हण, ब्राम्हणेतर असे वाद उफाळून येतात. काळानुसार ही परिस्थिती बदलत असते. त्यामुळे तरुणांनी जातीय राजकारणाचे बळी न होता तटस्थ विचार करणे आवश्यक असते. कोणाबद्दलही द्वेष नको.समाजातील स्थित्यंतरांबाबत साहित्यिकांनी ठोस भूमिका मांडण्याची गरज असते. अनुभूती, प्रतिभेतून तयार झालेले साहित्यिक भूमिका घेऊ शकतात. केवळ साहित्य संमेलनांमध्ये मिरवणारे, १० कादंब-या वाचूून स्वत:ची अकरावी कादंबरी लिहिणारा साहित्यिक काय भूमिका घेणार? साहित्यिकाने महाराष्ट्र पिंजून काढला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, समाजकारण जाणून घेतले पाहिजे. कोणतीही भूमिका घेण्यासाठी साहित्यिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. साहित्यिकच राजकीय पक्षांचे समर्थक असतील, तर ते घडामोडींबाबत काय भूमिका घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जगण्याशी निगडित भाष्यकविताराजकारण हा सुरुवातीपासून माझा आवडता विषय आहे. वडील स्वातंत्र्यसैनिक असल्याने मी लहानपणापासून समाजकारण, राजकारणाचा जवळून अनुभव घेतला आहे. मुंबईत होणा-या कामगार सभांना मी आवर्जून हजेरी लावायचो. नाटक, सिनेमाचे लहानपणापासून वेड होते. प्रेम, निसर्गकविता लिहायच्या नाहीत, जगण्या-मरण्याशी संबंधित लेखन करायचे हे मी सुरुवातीपासून ठरवले होते. वात्रटिका हा शब्द मूळचा पाडगावकरांचा. ‘जत्रा’ मासिकात लेखन करत असताना वात्रटिका हा शब्द वापरला गेला आणि तेव्हापासून वात्रटिकाकार हा शिक्का बसला. मुळात त्याचे स्वरुप भाष्यकवितेचे आहे.महाराष्ट्राबाहेरच्या महाराष्ट्राचा इतिहाससाहित्यिक, पत्रकार लेखणीतून बदल घडवत असतात. त्यामुळे त्यांनी कोणत्याही विचारसरणीमध्ये अडकून चालत नाही. कारण, कोणतीही विचारसरणी अंतिम सत्य नसते. कोणत्याही समस्येचे अथवा प्रश्नाचे उत्तर लेखणी शेवटपर्यंत देऊ शकत नाही. एखाद्याच विचारसरणीवर, पक्षावर लक्ष केंद्रित केले तर इतरांवर अन्याय होऊ शकतो. प्रत्येक राजकीय पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते. ठरावीक कुटुंबाकडे त्याचे शेअर्स असतात. त्यामुळे राजकीय पक्षाच्या धोरणांमध्ये न अडकता राजकीय पक्ष, विचारसरणी याबाबत लवचिक भूमिका स्वीकारायला हवी. ‘सामना’ या चित्रपटाची कल्पना पुढे आली तेव्हा लेखक शोधण्यापासून तयारी सुरु होती. लेखक पाठीशी नसेल तर सिनेमा चालत नाही. चित्रपटासाठी विजय तेंडुलकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सुरुवातीला नकार दिला. त्यावेळी आम्ही भेटलो की राजकारणावर गप्पा मारायचो. त्यादरम्यान, तेंडुलकर सहा महिने राजकारण समजून घेण्यासाठी दौरा करत होते. लिखाणासाठी तयार झाल्यावर त्यांनी श्रीराम लागू, निळू फुले यांचे नाव सुचवले. तेंडुलकर यांनी पन्हाळयाला जाऊन लेखन केले आणि चित्रपट आकाराला आला.प्रेक्षकांना सिनेमा आवडला. चित्रपट क्षेत्रात यश मिळेल याची खात्री नसल्याने नंतर चित्रपटाकडे वळलो नाही. कविता हेच ४० वर्षांपासून माझ्या उत्पन्नाचे साधन आहे. शरद पवार केंद्रीय कृषीमंत्रीपदावरुन राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आल्यानंतर ‘हिंदकेसरी जत्रेत कुस्त्या खेळू लागला, तेव्हा सह्याद्री गालातल्या गालात हसला, एमएचा विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसला’, मनोहर जोशी यांच्या शपथविधीवेळी ‘द्राक्षाच्या राजकारणाला रुद्राक्षाने दणका दिला, भुईमुगाच्या शेंगा दाखवत भाकरीसोबत झुणका दिला’, अशा भाष्यकवितांना त्यांनी उजाळा दिला.
वाचन, चिंतनातून भाष्यकविता टोकदार
By admin | Published: July 02, 2017 1:47 AM