मुंबई : ‘जनमंच थर्ड आय’ या स्वयंसेवी संस्थेने मंगळवारी आझाद मैदानात विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या सद्य:स्थितीवर भाष्य करणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून संस्थेने सिंचन प्रकल्पांमधील घोटाळ्यांची पोलखोल केली आहे.प्रदर्शनात विदर्भातील गोसेखुर्दचा उजवा कालवा, डावा कालवा, पिंपळगाव वखाजी, कार, तुरागोंदी, लोअर वर्धा, सत्रापूर, आणि अंभोरा या प्रकल्पांची सद्य:स्थिती दाखवण्यात आली आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रकल्पस्थळाला भेट देत ही छायाचित्रे गोळा केली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे १९८३ साली मंजूर झालेल्या गोसेखुर्दच्या प्रकल्पाची किंमत ३७२ कोटींवरून १८ हजार कोटींवर गेली आहे. शिवाय हा प्रकल्प कधी पूर्ण होणार, याबाबत विदर्भ सिंचन महामंडळाकडे ठोस उत्तर नसल्याचा संस्थेचा आरोप आहे. (प्रतिनिधी)
सिंचन घोटाळ्याचे वास्तव फोटोतून
By admin | Published: July 29, 2015 2:55 AM