शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

व्यवस्थेविरोधात ‘ब्र’ काढणाऱ्या बंडखोर लेखिका 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 9:51 PM

कविता महाजन हे नाव उच्चारल्यानंतर डोळ्यासमोर येतात त्या त्यांच्या बंडखोर लेखणीमधून उतरलेल्या ब्र आणि भिन्न अशा दोन कादंब-या.

ठळक मुद्देलघुकथांच्या अनुवादाला साहित्य अकादमीचा भाषांतरसाठीचा पुरस्कारएक बंडखोर लेखिका अशी त्यांची ओळ्ख कवयित्री बहिणाबाई पुरस्कार याच्या मानकरी

पुुणे : कविता महाजन हे नाव उच्चारल्यानंतर डोळ्यासमोर येतात त्या त्यांच्या बंडखोर लेखणीमधून उतरलेल्या ब्र आणि भिन्न अशा दोन कादंब-या. एका लेखकाच्या नव्हे तर कार्यकर्त्याच्या भूमिकेमधून त्यांचा संपूर्ण लेखनप्रवास सुरू होता. संशोधनवृत्ती हा त्यांचा लेखनाचा गाभा होता. आदिवासी भागातल्या अनुभवांचा इतिवृत्तांत, त्यासोबत स्वयंसेवी संस्थांमधल्यासह स्त्री-पुरुष संबंधांमधलं राजकारणदेखील त्यांनी ब्र मध्ये हळूवारपणे उलगडलं.ब्र नंतर भिन्न कादंबरीही एका सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणिवेतूनच त्यांनी जगासमोर आणली. एचआयव्ही पॉझिटिव्ह म्हणून जन्माला आलेली मुले, त्यांना जन्म देऊन तरुण वयात मृत्युमुखी पडलेल्या मुली, त्यांच्या यातना हे सगळं जग, छळ, फसवणूक, नात्यांवरचा, माणसांवरचा उडवणारा विश्वास त्यांनी जवळून अनुभवला होता. टाटा समाजविज्ञान संस्थेसाठी विदर्भातल्या आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवांची सद्यस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी एक अभ्यासदौराही त्यांनी  केला. जवळपास आठ महिने विदर्भात राहून त्यांनी मृत्यू, ताण, आत्महत्या झालेल्या त्या घरातल्या लहान वयाच्या मुलांच्या मनावर झालेला विपरित परिणाम पाहिला.         या दोन कादंब-यांमुळे त्या चर्चेत आल्या असल्या तरी त्यांच्या लेखनाची बीज ही कवितांपासून रूजली. तत्पुरुष, धुळीचा आवाज यासारख्या कवितासंग्रहांतल्या कविताच्या कविता  अनुष्टुभ,, कवितारती मिळून सा-याजणीसारख्या प्रथितयश नियतकालिकांतून प्रसिद्ध होत होत्या. या कविता वाचून ना.धों.महानोर, इंदिरा संत, शंकर-सरोजिनी वैद्य, प्रभा गणोरकर अशा अनेक दिग्गजांची त्यांना  दादही मिळाली होती. त्यांच्या धारदार लेखणीतून कागदावर उतरलेल्या कवितांमुळे स्त्रीवादाचा ठपका त्यांच्यावर बसला खरा; मात्र त्यांच्या कवितांमध्ये एका संवेदनशील आणि तरल मनाचे दर्शनही नकळतपणे घडले. वारली लोकगीताचं संपादन,  भारतीय लेखिका हा देशभरातील लेखिकांचे प्रतिबिंब दाखविणारा ग्रंथ हे त्यांच्या वैविध्यपूर्ण पैलूचेच दर्शन घडवितात. एक बंडखोर लेखिका अशी त्यांची ओळ्ख असली तरी लहान मुलांसाठी त्यांनी केलेले लेखन हे त्यांच्या एका मातृत्वाचे पैलू उलगडून दाखविते.  चित्रं, कॅलिग्राफी, फोटोग्राफी, अ?ॅनिमेशन, संगीत अशी विविध माध्यमांचा वापर करून त्यांनी लिहिलेली  कुहु ही मल्टिमिडीया कादंबरी हा भारतीय साहित्य विश्वातील आगळावेगळा प्रयोग ठरला. बकरीचं पिल्लू: जंगल गोष्टी पाच पुस्तकांचा संग्रह, जोयानाचे रंग बालसाहित्य त्यांनी लहानमुलांसाठी लिहिले. मराठवाडयातील नांदेडसारख्या छोट्याशा गावातील प्रतिभा निकेतन माध्यमिक शाळेमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतरच्या नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यलायात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. मराठी साहित्यात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. एका छोट्याशा शहरातून  मुंबईसारख्या मोठ्या शहरात त्यांनी स्वत:ची लेखनाच्या कक्षा अधिकच रूंदावत नेल्या. या लेखनकारर्किर्दीमध्ये त्या अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या. रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला साहित्य अकादमीचा भाषांतरसाठीचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाडमय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार, कवयित्री बहिणाबाई पुरस्कार याच्या मानकरी त्या ठरल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणे