शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

पावसाचा ‘विद्रोह’; आजही बरसणार, राज्याचा बहुतांश भागांना अवकाळीचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 6:57 AM

Rain in Maharashtra: आग्नेय अरबी समुद्र व लगतच्या लक्षद्वीप बेट समूह ते उत्तर किनारपट्टी यादरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

मुंबई/नाशिक/पुणे : आग्नेय अरबी समुद्र व लगतच्या लक्षद्वीप बेट समूह ते उत्तर किनारपट्टी यादरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कांद्यासह आंबा, द्राक्षे, काजू आदी फळपिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत आणखी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनावरही या पावसाचे सावट आहे.   

चक्रीवादळाचा धोकाथायलंडमध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र बंगालचा उपसागर व अंदमान समुद्रात आले असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन ते ४ डिसेंबरला आंध्रच्या किनारपट्टीलगत धडकण्याची शक्यता आहे. 

येथे पडणार पाऊस२ डिसेंबर : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वदूर ३ डिसेंबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा. विदर्भातही तुरळक ठिकाणी बरसणार

बुरशीनाशक फवारावेहा अवकाळी पाऊस ज्वारी व गहू या पिकांसाठी उपयुक्त आहे. काजू, द्राक्षे व आंब्याला बुरशीजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता असून, तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेतकऱ्यांनी पिकांवर बुरशीनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन कृषी खात्याने शेतकऱ्यांना केले आहे. 

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र