मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येला प्रेम प्रकरणेदेखील जबाबदार असल्याचे विधान माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांनी संसदेत तीन वेळा केले होते, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत सांगताच प्रचंड गदारोळ झाला. त्यासाठी दोनवेळा सभागृहाचे कामकाज बंद पडले. त्यानंतर काम सुरु झाले खरे; पण सभागृहात चर्चेच्यावेळी मंत्रीच हजर नाहीत म्हणत विरोधकांनी पुन्हा कामकाज बंद पाडले. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येस प्रेमप्रकरणे जबाबदार आहेत असे विधान केले आहे हे या सरकारला मान्य आहे का? असा सवाल विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करण्याची परवानगी महसूलमंत्री खडसे यांनी मागितली होती. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांना तशी परवानगी दिली होती. मराठवाड्याच्या प्रश्नावर प्रशांत बंब बोलत असताना सभागृहात ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ असा उल्लेख असलेल्या निवेदनाच्या प्रती वाटप करण्यात आल्या. या कशाच्या प्रती आहेत असा सवाल आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केला. कोणाच्या परवानगीने या प्रती वाटप केल्या जात आहेत याची चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली. तेव्हा तालिका अध्यक्ष चैनसुख संचेती यांनी चौकशी करुन माहिती दिली जाईल, असे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)आरोपावर भुजबळांचा तीव्र आक्षेपमंत्री खडसे यांनी तेच निवेदन घेऊन वाचायला सुरुवात केली. त्यात शरद पवार यांनी लोकसभेत व राज्यसभेत तीनवेळा लेखी उत्तर दिले होते व त्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यास शेतकऱ्यांची प्रेमप्रकरणे जबाबदार आहेत, असे सांगितल्याचे खडसे म्हणाले. त्यावर आ. छगन भुजबळ यांनी तीव्र आक्षेप घेतला.
आत्महत्यांवरून पुन्हा गदारोळ
By admin | Published: July 31, 2015 2:41 AM