शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

दोन कोटींची लाच घेणारा प्राप्तिकर आयुक्त अटकेत

By admin | Published: May 04, 2017 5:15 AM

रुईया कुटुंबाच्या मालकीच्या एस्सार उद्योगसमूहातील एका कंपनीशी संबंधित अपिलावर अनुकूल निकाल देण्यासाठी लाच

मुंबई : रुईया कुटुंबाच्या मालकीच्या एस्सार उद्योगसमूहातील एका कंपनीशी संबंधित अपिलावर अनुकूल निकाल देण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपावरून, केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) प्राप्तिकर विभागाचे मुंबईतील एक आयुक्त बी. बी. राजेंद्र प्रसाद व एस्सार समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप मित्तल यांच्यासह एकूण सहा जणांना अटक केली.‘सीबीआय’च्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने मुंबई आणि विशाखापट्टणम येथे धाडी घालून केलेल्या कारवाईने उद्योगविश्वात व प्राप्तिकर खात्यातही मोठी खळबळ उडाली. अलीकडच्या काळात प्राप्तिकर आयुक्त दर्जाचा अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडला जाण्याची ही पहिलीच घटना आहे.बी. बी. राजेंद्र प्रसाद भारतीय महसुली सेवेचा (आयआरएस) १९९२ च्या तुकडीतील अधिकारी असून, सध्या तो मुंबईत प्राप्तिकर आयुक्त (अपिल-३०) या पदावर होता. अटक केल्या गेलेल्या इतरांमध्ये एस्सार उद्योगसमूहाचा ‘एमडी’ प्रदीप मित्तल, त्याच समूहातील एका कंपनीचा मुंबईतील एक लेखाअधिकारी विपिन बाजपई, मे. जी. के. चोकसी या फर्मचा एक चार्टर्ड अकाउंटन्ट श्रेयस पारिख , बांधकाम व्यावसायिक  सुरेश कुमार जैन आणि त्याचा एक नातेवाईक मनीष जैन यांचा समावेश आहे. आरोपींकडून दीड कोटी रुपयांची रोकडही हस्तगत केली गेली. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एस्सार स्टील्स विशाखापट्टणम कॉर्पोरेशनशी संबंधित बालाजी ट्रस्टच्या एका अपिलाची सुनावणी प्राप्तिकर आयुक्त प्रसाद यांच्यापुढे होती. त्यात ट्रस्टच्या  बाजूने निकाल देण्यासाठी प्रसाद याने दोन  कोटी रुपयांची मागणी केली. ही  रक्कम ट्रस्टने मनीष जैन याच्याकडे द्यावी व त्याने ती विशाखापट्टणम येथे सुरेश  कुमार जैन यांच्याकडे पोहोचावावी, असे ठरले होते.सीबीआयच्या सूत्रांनुसार, मुंबईत महालक्ष्मी येथे सरकारी निवासस्थानात राहणारा प्रसाद हाही मूळचा विशाखापट्टणचा आहे. अपिलाचा अनुकूल निकाल दिल्यानंतर, तो मुद्दाम सुट्टी घेऊन विशाखापट्टणम येथे गेला व त्याने सुरेश कुमार जैन याच्याकडे लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून १९.३४ लाख रुपयांची मागणी केली. सीबीआयला याचा सुगावा लागल्यावर सापळा रचला गेला व सुरेश कुमार जैनकडून पैसे घेताना प्रसादला रंगेहाथ पकडले गेले. प्रसाद याला लाच देण्यासाठी मुंबईहून पाठविलेली १.५० कोटी रुपयांची उरलेली रक्कमही जैन याच्याकडून हस्तगत केली गेली. सर्व आरोपींच्या मुंबई व विशाखापट्टणम येथील कार्यालयांवर व निवासस्थानांवर धाडीही घालण्यात आल्या. त्यात स्थावर मालमत्तांमध्ये केलेल्या गुंतवणुकीची कागदपत्रे, बँक खात्यांचे तपशील, गुन्ह्याशी संबंधित अन्य दस्तावेज व दोन बँक लॉकरही मिळाले. या अपिलाच्या कामात सीए म्हणून श्रेयस पारेख याने काम पाहिले होते, असे सांगण्यात आले. (विशेष प्रतिनिधी) ट्रस्टच्या बाजूने निकाल देण्यास मागितले २ कोटीएस्सार स्टील्स विशाखापट्टणम कॉर्पोरेशनशी संबंधित बालाजी ट्रस्टच्या एका अपिलाची  सुनावणी प्राप्तिकर आयुक्त प्रसाद यांच्यापुढे होती.  त्यात ट्रस्टच्या बाजूने निकाल देण्यासाठी प्रसाद याने दोन कोटी रुपयांची मागणी केली.