पुणे : अरबी समुद्रातून आलेल्या जोरदार वाऱ्याने कोकण, मध्य महाराष्ट्राला झोडपून काढले असून अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. डहाणुत विक्रमी ३८३ मिमी पावसाची नोंद झाली असून घाटमाथ्यावरील ताम्हिणीत ३५८ मिमी पावसाची बरसात झाली आहे.
हवामान विभागाने कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाबरोबरच काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी दिवसभर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसला.उत्तर कोकण, पालघर, डहाणुमध्ये आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस झाला होता. गेल्या २४ तासात डहाणुत सर्वाधिक तब्बल ३८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर ताम्हिणीमध्ये ३५८ मिमी पाऊस झाला आहे.पुणे शहरात सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
आज कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख ठिकाणी बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस
महाबळेश्वर ३२०
भिरा ३२६
दावडी ३४८
डोंगरवाडी ३४०
अम्बोणे २४८
लोणावळा १८६
शिरगाव ३४८
ठाकुरवाडी ६०
वळवण १३३
भिवपुरी १०५
कोयना (पोफळी) २१५
कोयना (नवजा) १९१
वैतरणा १४१
तुलसी १५४
मध्य वैतरणा ९९
विहार १०५
मुंबई (कुलाबा) ५३
सांताक्रुझ ८४
पनवेल ६६
रत्नागिरी २१६
सांगली ३४
सातारा ६३
ठाणे ११०
कोल्हापूर ७०
हर्णोई ५८
पुणे शिवाजीनगर ५९
पाषाण ७३
लोहगाव ४८