शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

माथेरानमध्ये विक्रमी करवसुली

By admin | Published: April 06, 2017 2:50 AM

माथेरान गिरीस्थान नगरपालिकेने राबविलेल्या विशेष करवसुली मोहिमेअंतर्गत एक कोटी ४५ लाख २८ हजार ५६४ रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली

माथेरान : ‘क’ वर्ग असलेल्या माथेरान गिरीस्थान नगरपालिकेने राबविलेल्या विशेष करवसुली मोहिमेअंतर्गत एक कोटी ४५ लाख २८ हजार ५६४ रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली. गेल्यावर्षी २०१५-१६ वर्षाकरिता फक्त ६० लाख १९ हजार ५३० रुपये वसूल केले होते म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ८५ लाख ९ हजार ३४ रुपये जादा कर तिजोरीत जमा झाल्याने मुख्याधिकारी डॉ.सागर घोलप व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर माथेरानकरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.माथेरान नगरपालिकेने १०० टक्के मालमत्ता करवसुलीसाठी विशेष मालमत्ता वसुली मोहीम राबविण्यासाठी कार्यपद्धती ठरवून दिली होती. या मोहिमेअंतर्गत माथेरान नगरपालिकेने विविध मार्गांचा अवलंब केला. यामध्ये दवंडी पिटवून, थकबाकीदारांची नावे नाक्यानाक्यांवर लावून, ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सूचना देऊन, केबल टीव्हीद्वारे आवाहन करून, तसेच प्रत्येक विभागात बॅनरबाजी करून पालिकेने वसुलीसाठी प्रयत्न केले. यात वसुली पथके तयार करून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन कर्मचाऱ्यांना भेटी देण्यात आल्या व वेळोवेळी थकबाकीदारांना नोटिसाही दिल्या होत्या. नगरपालिका क्षेत्रात २०१५-१६ च्या असेसमेंटनुसार ९६१ मालमत्ताधारक आहेत. त्यापैकी माथेरान भूखंड १९९, बाजार भूखंड १८१, अनधिकृत घरे ५८१, स्टॉल २३९ अशा मालमत्ता आहेत.गेली १५ ते २० वर्षे काही मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरला नव्हता अशांना सील लावणे, जप्ती आणणे अशा नोटिसा देऊन कर वसूल करण्यात नगरपालिकेला यश आले आहे, परंतु काही हॉटेलधारकांनी नोटीस न घेतल्यामुळे त्यांच्या हॉटेलला सील करण्यात आले आहे. यामध्ये ब्राईटलॅन्ड हॉटेल यांनी ४ वर्षांचा ८ लाख ९७ हजार ७६८ रु पये, शिरीन हॉटेल ३ वर्षांचा ६५ हजार २५१ रुपये, आनंद रीट्झ ७ वर्षांचा १८ लाख ५० हजार ७९५ रु पये या हॉटेलचा समावेश आहे. तसेच ज्या हॉटेलधारकांनी मालमत्ता कर भरला नाही अशा हॉटेल्सना हॉटेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव प्रसाद सावंत यांनी व्हॉट्सअ‍ॅपवरून हॉटेलधारकांना आवाहन केले होते. तसेच ज्या स्टॉलधारकांनी कर भरला नव्हता त्यांचा दंडासह कर वसूल करण्यात पालिकेला यश आले आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर भर पडली आहे.डॉ.सागर घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ लिपिक रत्नदीप प्रधान, वरिष्ठ लिपिक व करवसुली विभागाचे नरेंद्र धनावडे, ऋ षिता शिंदे, प्रवीण सुर्वे, राजेश रांजाणे, संदेश कदम आदींनी विशेष परिश्रम घेऊन ही करवसुली यशस्वी केली.(वार्ताहर)पेणमध्ये उद्दिष्टापेक्षा जास्त महसूल जमातहसीलदार कार्यालयाने २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०१७ अखेर दिलेल्या उद्दिष्टापेक्षा १४७.१० टक्के महसूल जमा करीत शासकीय तिजोरीत तब्बल १७ कोटी ९१ लाख रुपये जमा के ले आहेत. हा विक्रमी महसूल जमा करीत रायगड जिल्ह्यात नंबर वनची जागा पटकाविली असून पेण तहसीलदार अजय पारणे आणि त्यांचे सहकारी नायब तहसीलदार धनंजय कांबळे, नायब तहसीलदार (पुरवठा) मोरेश्वर हाडके हे अभिनंदनास पात्र ठरले आहेत. दिलेल्या १२ कोटी १७ लाख उद्दिष्टापेक्षा ५ कोटी ९१ लाख जास्त महसुलाची रक्कम सरकारी तिजोरीत जमा करीत १४७.१० टक्के करवसुली जमा करण्याचा नवा विक्रम पेण तहसीलदार अजय पाटणे यांच्या नावावर जमा झाल्याने जिल्हाधिकारी रायगड यांच्या अभिनंदनास ते पात्र ठरले. शासकीय वसुलीच्या २०१६-२०१७ च्या आर्थिक वर्षात ‘अ’ पत्रक महसुली इष्टांक ८ कोटी ८६ लाख ३२ हजार दिला होता. त्यामध्ये ३१ मार्च २०१७ पर्यंत १२ कोटी ६७ लाख ६० हजार महसुलाची वसुली ‘ब’ पत्रकात आरआरसी मूळ मागणी १ कोटी ७२ लाख रुपयांपैकी ५० हजार रुपयांची वसुली यामध्ये टक्केवारी कमी झाली मात्र ती उणीव इतर सर्व प्रकारात भर काढीत टीमने जानेवारी १७ ते मार्च १७ या तीन महिन्यांत झटून काम केले. ‘क’ पत्रकाची मूळ मागणी ९३ लाख ७५ हजार पैकी १ लक्ष २३ लाख जमा झाली आहे. एकूण अबकारी कर मागणीपत्रात १२ कोटी १७ लाख ५७ हजारांचे उद्दिष्ट दिले होते. ते इष्टांक पार करीत १७ कोटी ९१ लाख महसुली कर शासकीय तिजोरीत जमा करण्यात आलेला आहे. टक्केवारीनुसार ‘अ’ पत्रक मूळ मागणी ४ कोटी ५४ लाख त्यामध्ये वाढीव मागणी व इष्टांक ८ कोटी ८६ लाख ३२ हजार झाली. त्याची वसुली १५ कोटी ८६ लाख ८१ हजार करून त्यांची टक्केवारी १७९.०३ टक्के विक्रमी झाली. ‘अ’ पत्रकाची ही महसूल वसुलीच वरचढ ठरून लक्षांक गाठण्यात सहज साध्य झाले. ‘ब’ पत्रकातील आरआरसी टक्केवारी २९.७ टक्के, गौण खनिज ८०.९८ टक्के करमणूक कराची वसुली १२६.०० टक्के, एकूण व पत्रकाची टक्केवारी ८५.४६ टक्के झाली तर ‘क’ पत्रक वसुलीची टक्केवारी १.३१ टक्के अशी एकूण १४७.१० टक्के विक्रमी करवसुली झाली आहे.गेली १५ ते २० वर्षे काही मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरला नव्हता अशांना सील लावणे, जप्ती आणणे अशा नोटिसा देऊन कर वसूल करण्यात माथेरान नगरपालिकेला यश आले.गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ८५ लाख ९ हजार ३४ रुपये रक्कम जास्त वसूल केल्याने माथेरानच्या रखडलेल्या विकासकामांना नक्कीच गती येऊन माथेरान हे उत्तम पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येईल.- डॉ.सागर घोलप, मुख्याधिकारी