सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सिंधु कृषी, पशुपक्षी पर्यटन महोत्सवाला दीड लाख शेतकरी, पशुपालक व पर्यटकांनी भेट दिली असून या चार दिवसांत तब्बल सहा कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव उपस्थित होते.२३ ते २६ डिसेंबर या कालावधीत वागदे येथे सिंधु कृषी, पशुपक्षी पर्यटन मेळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात जनावरांची विक्री होऊन कोट्यवधीची उलाढाल झाली होती. याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत बोलत होते.यावेळी संदेश सावंत व उपाध्यक्ष रणजित देसाई म्हणाले, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, पर्यटक, शेतकरी, जिल्हा बँक, वागदे ग्रामपंचायत, जमीनदार यांच्या सहकार्यामुळे कृषी, पशु पर्यटन महोत्सव यशस्वी झाला. या मेळाव्याला जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून पर्यटक, शेतकरी आदी दीड लाख पशुपालकांनी उपस्थिती दर्शविली. या मेळाव्यात ३२० दुधाळ जनावरांचा सहभाग होता. यातील शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे जिल्हा बँकेचे कर्ज घेऊन २०३ दुधाळ जनावरे तसेच बैलांची खरेदी केली. यावेळी हायड्रोफोनिक चारा लागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले होते. लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुरगूड, हैद्राबाद बॉर्डरवरून जनावरे दाखल झाली होती. शेतीविषयक नवनवीन यंत्र सामुग्रीची खरेदीही या मेळ्यात करण्यात आली. ऊस लागवड, शेळी, मेंढीपालन, पंचगव्य चिकित्सा, आदी विषयांवर तज्ज्ञांमार्फत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादालाही शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कित्येक शेतकऱ्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. (प्रतिनिधी)पुढच्या वर्षीचा महोत्सव सावंतवाडी मतदारसंघातपुढच्या वर्षी म्हणजेच २०१६ मध्ये होणाऱ्या कृषी, पशुपक्षी पर्यटन मेळाव्याचे ठिकाण हे सावंतवाडी मतदारसंघात असेल. पहिल्या वर्षी कुडाळ मतदारसंघ, त्यानंतर कणकवली मतदारसंघात मेळावा झाल्याने आता सावंतवाडी मतदारसंघात हा मेळावा होणार आहे. यात सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला या तीन तालुक्यांपैकी कोणत्याही एका तालुक्यात मेळावा आयोजित केला जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत व उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी स्पष्ट केले.सहा कोटींची विक्रमी उलाढालवागदे येथे पार पडलेल्या कृषी, पक्षी पर्यटन मेळाव्याला उदंड प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात शेतीविषयक आवश्यक यंत्रांची, ट्रॅक्टर, जनावरे, आदींची खरेदी होऊन हा आकडा तब्बल सहा कोटींवर पोहोचला आहे. गतवर्षी कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या पशु मेळाव्याला याच माध्यमातून चार कोटी २८ लाख रुपयांची उलाढाल झालेल्याचा आकडा आहे. तसेच ७५ हजार शेतकरी व पर्यटकांनी हजेरी लावली होती.पुढच्या वर्षीचा महोत्सव सावंतवाडी मतदारसंघातपुढच्या वर्षी म्हणजेच २०१६ मध्ये होणाऱ्या कृषी, पशुपक्षी पर्यटन मेळाव्याचे ठिकाण हे सावंतवाडी मतदारसंघात असेल. पहिल्या वर्षी कुडाळ मतदारसंघ, त्यानंतर कणकवली मतदारसंघात मेळावा झाल्याने आता सावंतवाडी मतदारसंघात हा मेळावा होणार आहे. यात सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला या तीन तालुक्यांपैकी कोणत्याही एका तालुक्यात मेळावा आयोजित केला जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत व उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी स्पष्ट केले.
सहा कोटींची विक्रमी उलाढाल
By admin | Published: January 01, 2016 9:12 PM