IBPS RRB Application 2020: आयबीपीएस आरआरबी क्लार्क आणि अधिकारी पदांसाठी मोठी भरती आयोजित करण्यात आली होती. एकूण 8424 जागा भरण्यात येणार असून ibpsonline.ibps.in वर अर्ज करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे.
महत्वाचे म्हणजे 1 जुलैला इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने 43 बँकांमध्ये 9638 पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये पुन्हा 8424 जागा वाढविण्यात आल्या आहेत. या जागा ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल 1 च्या असणार आहेत.
आयबीपीएस आरआरबी रिक्रुटमेंट 2020 मध्ये 43 वेगवेगळ्या ग्रामीण बँकांमध्ये ही भरती केली जाणार आहे.धिकृत जाहिरातीनुसार यामध्ये यूपी ग्रामीण बँक, उत्तर बिहार ग्रामीण बँक, हरियाणा ग्रामीण बँक, राजस्थान मुरुधारा ग्रामीण बँक, मध्यांचल ग्रामीण बँक, मध्य प्रदेश ग्रामीण बँक, हिमाचल प्रदेश ग्रामीण बँक, झारखंड राज्य ग्रामीण बँक, बड़ौदा यूपी बँक, आर्यवर्त बँक लखनऊ, दक्षिण बिहार ग्रामीण बँक, पटना बिहार, बडोदा राजस्थान क्षेत्रीय ग्रामीण बँक आणि छत्तीसगढ़ राज्य ग्रामीण बँकेसह अन्य राज्यांच्या बँकांचा समावेश आहे.
वयाची अट क्लार्क पदासाठी 9 नोव्हेंबरला उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे असायला हवे. तर अधिकारी वर्गासाठी 18 ते 30 वर्षे असायला हवे.अर्ज शुल्क 850 रुपये ठेवण्यात आले आहे. तर आरक्षित उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 175 रुपये ठेवण्यात आले आहे.
पगार किती असेल? ऑफिस असिस्टंटला 7200 रुपये ते 19300 रुपये पगार असणार आहे. तर ऑफिसर स्केल - I (असिस्ंटट मॅनेजर) - 14500 रुपये ते 25700 रुपये प्रति महिना पगार असणार आहे.
मुख्य जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा....अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...
जुलैमधील जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
SBI देखील भरती करणार...भारतीय स्टेट बँकेने पुढील 6 महिन्यांमध्ये 2000 कनिष्ठ आणि मध्यम श्रेणीच्या एक्झिक्युटीव्हची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या योजनेविषयी माहिती असणाऱ्या दोन लोकांनी सांगितले की, ग्रामीण भागामध्ये चांगला विकास होण्यासाठी आणि बँकेच्या व्यवसाय वाढीसाठी ही भरती करण्यात येणार आहे. बँक ग्राहकांकडून ज्या सेवांसाठी पैसे आकारते त्या सेवांचा विस्तार ग्रामीण भागामध्ये करण्यात येणार आहे. कोरोनामुळे बँकेचे उत्पन्न घटले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.