शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

भरती प्रक्रियेकडे १४१९ जणांची पाठ

By admin | Published: April 08, 2017 11:16 PM

उस्मानाबाद : येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस भरती प्रक्रियेतील १४१९ जणांनी भरती प्रक्रियेकडे पाठ फिरविली़

कोल्हापूर : कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नि:संदिग्धपणे ग्वाही दिली असतानाही खंडपीठ कृती समितीने त्यांच्यावर अविश्वास दाखवून आंदोलन मागे न घेता स्थगित केले व त्यांना ‘कोल्हापूर बंद’चा अल्टिमेटम दिला. कृती समितीची ही भूमिका मान्य नसल्याने या आंदोलनाचे नेतृत्व सोडत असल्याची घोषणा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी शनिवारी कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. कृती समितीने केलेल्या ठरावाशी आपण एक टक्काही सहमत नाही. ज्यांनी मला स्वत:हून या आंदोलनाचे नेतृत्व दिले, त्यांच्या व माझ्या भूमिकेत फरक पडत असेल तर त्यांचे नेतृत्व करणे तात्त्विकदृष्ट्या माझ्या मनाला पटत नसल्यानेच हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्रा. पाटील म्हणाले, ‘खंडपीठ कृती समितीची बुधवारी (दि. ५) मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरला खंडपीठ देण्यासंदर्भात शासन आवश्यकता असल्यास नव्याने ठराव करून देईल, असे स्पष्ट केले. पूर्वी दिलेल्या ठरावानुसार न्यायालयाने कार्यवाही सुरू करावी, असे पत्रही आठ दिवसांत देण्याचे आश्वासन दिले. लोकशाहीत चर्चेतूनच प्रश्न सुटतात व तुम्हांला एकदा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यावर एका टप्प्यावर कुठेतरी त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. त्यामुळे कृती समितीने मुंबईच्या बैठकीतच आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा करायला हवी होती. ते मुख्यमंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन एक पाऊल पुढे टाकल्यासारखे झाले असते. आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. मग ज्यांच्याकडून आपण अपेक्षा करतो, त्यांच्यावर थोडा का असेना, विश्वास ठेवला पाहिजे, या मताचा मी आहे. परंतु कृती समितीत आपापसांत मतभेद आहेत. शुक्रवारच्या बैठकीत आंदोलन झालेच पाहिजे, असा आग्रहही अनेकांनी धरल्याचे बातम्यांतून वाचले. त्यामुळे तुमच्या अंतर्गत कुरबुरी आणि श्रेयवादाच्या कोंडाळ्यात मला अडकायचे नाही. मला या प्रश्नाात कोणतेही राजकारण करण्याचे नाही की कुणाचा हिशोब चुकता करायचा नाही. माझ्या गेल्या सत्तर वर्षांच्या सामाजिक जीवनात मला कधीच आत एक आणि बाहेर एक अशी भूमिका घेता आली नाही. त्यामुळे तसे माझ्याशी कोण वागणार असेल तर माझे त्यांच्याशी जमणार नाही, या भावनेतून मी हा निर्णय घेतला आहे.’ कृती समितीचा निर्णय प्रा. पाटील यांना रुचला नसल्याचे समितीच्या सदस्यांना समजल्यावर शनिवारी सकाळी समितीचे अध्यक्ष प्रकाश मोरे, विवेक घाटगे, महादेवराव आडगुळे आणि राष्ट्रवादीचे नेते आर. के. पोवार यांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली. आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय चुकला असल्याची कबुली या सदस्यांनी दिली. ‘आम्ही उद्याच मुख्यमंत्र्यांना हे आंदोलन मागे घेत असल्याचे पत्र पाठवितो. तेव्हा तुम्ही या आंदोलनाचे नेतृत्व सोडू नका. नाहीतर हे आंदोलन दुबळे होईल,’ अशी विनंती केली; परंतू एन. डी. पाटील आपल्या भूमिकेशी ठाम राहिले. ‘तुम्ही नक्की काय पत्र देता आणि एकसुरी पाठिंबा मिळाल्यासच त्याबाबत विचार करू,’ असे आश्वासन प्रा. पाटील यांनी दिले. कोणत्याही आंदोलनात प्रत्येकाच्या भूमिकेचा विचार करीत बसलो तर ते कधीच यशस्वी होत नाही. व्यापक समाजहित ज्यामध्ये आहे, त्याचाच विचार करून पुढे जावे लागते. मी आंदोलनात हा प्रश्न वकिलांचा आहे म्हणून सहभागी झालेलो नाही. चंदगडच्या शेवटच्या गावातील माझ्या गोरगरीब माणसाला होणारा त्रास वाचला पाहिजे, ही त्यामागील माझी तळमळ आहे. ती समितीने लक्षात घ्यावी, असे प्रा. पाटील यांनी बजावले.छाती फाडून दाखवावी का...?चर्चेमध्ये काही निर्णय झाला तर त्यानुसार वागण्याची आपली जबाबदारी असते. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर त्यांच्या दारात आंंदोलन करण्यासही आम्ही कधी मागे-पुढे पाहिले नसते. आता त्यांनी प्रश्न सोडवितो असे सांगूनही तुम्ही त्यांना अल्टिमेटम देत असाल तर मग हनुमानाने छाती फाडून जसा राम दाखविला तसे मुख्यमंत्र्यांनी छाती फाडून खंडपीठ दाखवायला हवे का? अशी विचारणा त्यांनी केली.सर्किट बेंच कोल्हापुरातच व्हावे; अन्य कोणत्याही शहरात नाही, असा स्पष्ट अभिप्रायही माजी न्यायाधीश मोहित शहा यांनी दिला आहे. उच्च न्यायालयानेही २५ मार्च २०११ रोजी राज्य शासनाला पुण्यात सर्किट बेंच करता येणार नाही असे लेखी पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे सर्किट बेंच कोल्हापुरातच होण्यास बळकटी मिळत असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.