शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

सैन्यदलाची राज्यात भरती प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 7:00 AM

सैन्यदलातील विविध पदांसाठी युवकांना अर्ज करता येणार

ठळक मुद्देअनेक वर्षानंतर बेरोजगार युवकांना मिळणार दिलासा दहावी ते बारावी उत्तीर्ण झालेल्या युवकांना या मुळे चांगली संधी निर्माण राज्यातील ५ केंद्रांमार्फत ही भरती प्रक्रिया सुरू केंद्रामार्फत सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक

प्रशांत ननवरे- बारामती : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली सैन्यदलाची भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे.  राज्यातील ५ केंद्रांमार्फत ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेमुळे बेरोजगारांना सैन्यदलात भरती होण्याची संधी मिळणार आहे. सैन्यदलातील विविध पदांसाठी युवकांना अर्ज करता येणार आहे.  दहावी ते बारावी उत्तीर्ण झालेल्या युवकांना या मुळे चांगली संधी निर्माण झाली आहे. लष्कर भरतीचे राज्यात पाच भरती केंद्र (आर्मी रिक्रुटिंग ऑफिस)आहे. या केंद्रामार्फत सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. भरतीमध्ये सोल्जर जनरल ड्यूटी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर क्लर्क, स्टोअर किपर, सोल्जर नर्सिंग असिस्टंट, सोल्जर ट्रेड्समन या पदांचा समावेश आहे. यासाठी नोंदणी १ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२० पर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष उमेदवारांची कागदपत्रे तपासणे, मैदानी चाचणी, दि. ४ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२० पर्यंत बीड मधील सैनिक विद्यालयात होणार आहे. पुणे सैन्य भरती केंद्राच्या अंतर्गत पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर या ५ जिल्ह्यातील उमेदवारांना यामध्ये सहभागी होता येईल.त्याचप्रमाणे मुंबई सैन्य भरती केंद्रामार्फत आॅनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. १३ आॅक्टोबरला सुरू झालेली ही नोंदणी २७ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारांची  प्रत्यक्ष कागदपत्रे व मैदान चाचणी १३ ते २३ डिसेंबर या कालावधीत ठाण्यातील मुंब्रा येथे अब्दुल कलाम आझाद स्पोटर्स स्टेडियम येथे सुरू होणार आहे. या मुंबई केंद्रांतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड या ६ जिल्ह्यातील उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल. औरंगाबाद केंद्रामध्ये आॅनलाईन नोंदणी ५ नोव्हेंबर रोजी सुरू झाली आहे. ती १९ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारांची कागदपत्र तपासणी व प्रत्यक्ष मैदानी चाचणी ४ जानेवारी ते १३ जानेवारी या कालावधीत वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे होणार आहे. तसेच कोल्हापूर भरती केंद्र, नागपूर भरती केंद्राची सैन्य भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये विविध पदांसाठी वेगवेगळ्या शारीरिक चाचण्या आहेत. या चाचणींमध्ये पदनिहाय वेगवेगळ्या शरीरिक चाचण्या होतील. यामध्ये उंची, छाती, वजन आदी मोजमाप महत्त्वाचे ठरणार आहेत. तसेच, १६०० मीटर धावणे, पुलअप्स काढण्यासाठी स्वतंत्र गुण ठेवण्यात आले आहेत. कागदपत्र तपासणीमध्ये मूळ कागदपत्रासह दोन प्रमाणित केलेल्या झेरॉक्स, नोंदणी केल्यानंतर मिळणारे अ‍ॅडमिट कार्ड, फोटो, शैक्षणिक कागदपत्र, वर्तणूक दाखला, चारित्र्य दाखला, आॅफिडेव्हीट आदी कागदपत्रे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. उमेदवाराच्या घेतल्या जाणाºया वैद्यकीय चाचणीमध्ये दृष्टीदोष, दात, हिरड्या, टॅट्यू आदीची तपासणी केली जाते. यामध्ये, पात्र झाल्यानंतर शेवटी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी ५० प्रश्नांना १०० गुण ठेवण्यात आले आहे. या लेखी परीक्षेसाठी ६० मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. परीक्षेत ३० गुणांसाठी सामान्य ज्ञान, ३० गुणांसाठी विज्ञान तंत्रज्ञान, ३० गुणांसाठी गणित, १० गुणांसाठी बुद्धिमत्ता चाचणी या घटकांचा समावेश होतो. याबाबत बारामती येथील ‘सह्याद्री करिअर’चे प्रमुख उमेश रूपनवर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, सैन्यभरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन नोंदणी  आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवाराने संबंधित भरती केंद्र आणि नोंदणीसाठी आवश्यक कालावधी समजून घ्यावा. त्यानंतरच भरतीचे परीपूर्ण नियोजन करावे. मैदानी चाचणीचे बारकावे समजून घेतल्यास सैन्यभरतीमध्ये उमेदवारांना यश मिळेल. मात्र, उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील रूपनवर यांनी केले आहे.———————————

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवान