शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Pune Metro: पुणे मेट्रोमध्ये नोकर भरती; ITI, इंजिनिअर, डिप्लोमाधारकांना मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 4:22 PM

Pune Metro Rail Recruitment 2020 – 2021: पुणे मेट्रोचे काम जोरात सुरु आहे. काही महिन्यांत मेट्रोच्या चाचण्यादेखील घेतल्या जाणार आहेत. यामुळे मेट्रोने भरती सुरु केली आहे.

Pune Metro Rail Bharti 2020 -21 पुणेमेट्रोमध्ये वेगवेगळ्या जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 

टेक्निशिअन, स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर, सेक्शन इंजिनिअर, ज्युनिअर इंजिनिअर आदी जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांना मेट्रोच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. एकूण १३९ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन पुणेद्वारे (Maharashtra Metro Rail Corporation Pune) हे अर्ज मागविले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2021 आहे. 

शिक्षणाची अट...

  • टेक्निशिअनसाठी आयटीआय (NCVT / SCVT). 
  • स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटरसाठी - तीन वर्षांचा इंजिनिअर डिप्लोमा इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, मान्यताप्राप्त विद्यापीठ. 
  • सेक्शन इंजिनिअर - 4 वर्षे इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण. 
  • ज्युनिअर इंजिनिअर - तीन वर्षांचा इंजिनिअर डिप्लोमा 

 

शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 400 रुपये आणि राखीव वर्गासाठी 150 रुपये फी आकारण्यात येणार आहे. परीक्षा आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 

अर्ज कसा कराल...नोटिफिकेशन पाहण्यासाठी, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा ... 

SBI SO Recruitment 2020, Sarkari Naukri Job 2020: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यानुसार स्पेशालिस्ट ऑफिसरच्या रिक्त असलेल्या 452 पदांवर भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. ११ जानेवारीपर्यंत उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. 

बँकेने सर्व विभागातील वेगवेगळ्या जागांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची पहिली प्रिलिम्स परीक्षा फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. याच्या तारखा लवकरच जाहीर करण्य़ात य़ेणार आहेत. 

शैक्षणिक अटमॅनेजर, डेप्युटी मॅनेजर पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्टॅटिक्स किंवा गणित किंवा अर्थशास्त्रामध्य़े पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असायला हवी. यामध्ये ६० टक्क्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. MBA, MGDM आणि BTech पदवी असलेल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. मॅनेजर पदासाठी वयोमर्यादा 25 ते 45 वर्षे आहे. डेप्युटी मॅनेजर पदासाठी 21 ते 35 वर्षे आहे. तर असिस्टंट मॅनेजर पदासाठी 28 ते 30 वर्षे आहे. इंजिनिअर पदांसाठी 40 वर्षे आहे. यासाठी 23 हजार ते 51 हजार रुपये एवढा पगार दिला जाणार आहे. 

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा...

 

IDBI Bank Recruitment 2020: इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) मध्ये अधिकारी बनण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आयडीबीआयने (IDBI Bank) स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (Specialist Cadre Officer) पदांसाठी भरती काढली आहे.

 पदवीधारकांपासून ते इंजिनिअर आणि सीए शिकलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीची माहिती, नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. 

पदे : डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेड-डी) - 11 पदेअसिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड-सी) - 52 पदेमॅनेजर (ग्रेड-बी) - 62 पदेअसिस्टंट मॅनेजर (ग्रेड-ए) - 09 पदेएकूण पदांची संख्या - 134

LIC मध्ये भरती; विना परिक्षा होणार निवड, 14 लाखांपर्यंतचे पॅकेज

अर्ज कसा कराल? या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी आयडीबीआय बँकेच्या वेबसाईट idbibank.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात २४ डिसेंबर २०२० पासून होत आहे. ७ जानेवारी २०२१ शेवटची तारीख असणार आहे. अर्जासाठीची लिंक पुढे देण्यात आली आहे. 

निवड कशी होईल? या पदांसाठी आलेल्या अर्जांद्वारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे.  यानंतर त्यांना ग्रुप डिस्कशन / पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाईल. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. 

Government Jobs: कॅशिअर, इलेक्ट्रीशियन, क्लार्क, नर्ससाठी शेकडो पदांवर भरती; केंद्र सरकारी नोकरीची संधी

Bank of Baroda Recruitment 2020-21: बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officers) पदांच्या जागा निघाल्या आहेत. बँक ऑफ बडोदाने या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन काढले आहे. यानुसार या पदांवर ८ जानेवारी  २०२१ पर्यंत अर्ज भरायचे आहेत. इच्छुक उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोiti collegeआयटीआय कॉलेजgovernment jobs updateसरकारी नोकरीjobनोकरी