चिन्मय काळेमुंबई : ई-वाहनांबाबत भारताची संकल्पना चांगली आहे; मात्र ही वाहने रस्त्यावर येण्याआधी येथील वाहतुकीची फेररचना अत्यावश्यक आहे. त्याशिवाय या ई-वाहनांची संकल्पना साकार होणे शक्य नाही, असे मत लक्झरी कारचे निर्माते टोनिनो व त्यांचे सुपुत्र गिनेर्व्हा लॅम्बोर्घिनी यांनी ‘लोकमत’शी केलेल्या चर्चेवेळी व्यक्त केले.लॅम्बोर्घिनी यांनी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या गुंतवणूक परिषदेत सोमवारी कायनेटिक ग्रीन या कंपनीसोबत करार केला. या कराराच्या निमित्ताने ‘लोकमत’ने त्यांच्याशी चर्चा केली. या करारांतर्गत बॅटरीवर चालणाºया ‘गोल्फ कार्ट’ व अन्य आॅफ रोड गाड्या बाजारात आणण्यासाठी लॅम्बोर्घिनी हे कायनॅटिक ग्रीनचीमदत करणार आहेत. लॅम्बोर्घिनी म्हणाले, ई-वाहन संकल्पना अत्यंत चांगली आहे. युरोपसारखे थंड प्रदेशातील देश हे साध्य करू शकत असतील, तर भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशात याची आवश्यकता मोठी आहे. मात्र यासाठी भारतात वाहतुकीसंबंधात मोठे काम करावे लागेल. लॅम्बोर्घिनी ही लक्झरी श्रेणीतीलकार उत्पादक कंपनी असली तरी कंपनी ई-वाहने तयार करीत नाही.याबाबत गिनेर्व्हा यांनी सांगितले की, आमच्याकडेई-वाहनांचे डिझाईन तयार आहे. मात्र त्याचे तंत्रज्ञान नाही. हे तंत्रज्ञान कायनॅटिक ग्रीनकडे आहे. यासाठीच त्यांच्यासोबत करार केला आहे. तीन महिन्यांत यासंबंधीचे चित्र स्पष्ट होईल.अहमदनगरात येईल कारखानाकायनॅटिक ग्रीन व लॅम्बोर्घिनी हे संयुक्त कंपनी स्थापन करणार आहेत. त्याद्वारे संशोधन व विकासाद्वारे ई-वाहनांची निर्मिती केली जाईल. हा कारखाना अहमदनगरात उभा केला जाणार आहे. मात्र सध्या या दोन कंपन्यांमध्ये केवळ नियोजनासंबंधी सामंजस्य करार झाला आहे. नेमकी गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आदीसर्व आरखडा तीन महिन्यांत घोषित केला जाणार असल्याचे कायनॅटिकच्या संस्थापक सीईओ सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांनी सांगितले.
वाहतुकीची फेररचना आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 3:34 AM