पुणे : रेल्वेच्या गाड्या, लोहमार्ग, स्थानक तसेच स्वच्छतागृहांसाठी वापरल्या जाणारे शुद्ध करून ते पुन्हा वापरले जाणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून दोन मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत असून या प्रकल्पांची क्षमता प्रतिदिन ३ लाख ५० हजार लिटरची आहे. त्यामुळे लाखो लिटर स्वच्छ पाण्याची बचत होणार आहे. रेल्वेच्या पुणे विभागाचे प्रबंधक बी. के. दादाभॉय यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी दादाभॉय यांनी गेल्या दोन वर्षांत रेल्वे प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेले प्रकल्प तसेच उपक्रमांची माहिती दिली.पुणे स्थानकासाठी दरदिवशी रेल्वे प्रशासनास सुमारे ५ लाख लिटर पाण्याची गरज भासते. हे पाणी रेल्वे घोरपडी येथे असलेली रेल्वेची विहीर, तसेच महापालिकेकडून घेतले जात होते. या पाण्यातील बहुतांश पाणी गाड्या तसेच ट्रॅक धुण्यासाठी जाते. हे पाणी नंतर वापरले जात नसल्याने हे सर्व पाणी नाल्यात वाहून जात होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हे पाणी स्वच्छ करून पुन्हा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ मेटल डिटेक्टर म्हणजे सुरक्षा नाही या पत्रकार परिषदेत रेल्वे स्थानकातील बंद असलेले मेटल डिटेक्टर आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत विचारणा केली असता दादाभॉय यांनी हात झटकले, रेल्वे स्थानकावर मेटल डिटेक्टर चालू असेल तरच सुरक्षा असते का, स्थानकाचा परिसर सर्व बाजूंनी उघडा आहे. मग आम्ही काय तेवढेच काम करायचे का, अशा शब्दांत त्यांनी स्थानकाच्या सुरक्षेवरून हात झटकले. याशिवाय रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची सुरक्षा आणि प्रवाशांना होणारा त्रास आम्ही देत नाही. त्याची काळजी त्यांची त्यांनी घ्यावी, असे सांगत सुरक्षा तसेच स्वच्छतेचे खापर प्रवाशांवरच फोडले. एलईडी दिवे वाचविणार ५५ लाखांची वीजवीज बचत आणि पर्यावरणसंवर्धनासाठी रेल्वे मंत्रालयाकडून सर्व रेल्वे स्थानकांवर एलईडी बल्ब लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पुणे विभागाने पुणे स्टेशन, तळेगाव तसेच शिवाजीनगर या स्थानकांवर एलईडी दिवे बसविले असून त्या माध्यमातून दर दिवशी १५ हजार रुपयांची वीज बचत होत आहे. वर्षाला ही रक्कम तब्बल ५५ लाखांची आहे. याशिवाय एका खासगी कंपनीच्या माध्यमातून पुणे स्टेशनवर सौरऊर्जेचे पॅनल बसविले जात असून त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर संपूर्ण स्थानक सौरऊर्जेवर चालणार असल्याचेही दादाभॉय यांनी सांगितले.मानवरहित अवघी दोन गेटपुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या रेल्वेच्या हद्दीत सुमारे १७० रेल्वे क्रॉसिंग गेट आहेत. त्यातील जवळपास १६ गेट मागील दोन वर्षांपर्यंत मानवरहित होती. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडत होते. त्यातील जवळपास १३ गेट विविध उपाययोजना करून बंद करण्यात आले असून आणखी २ गेट या वर्षभरात बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे विभाग रेल्वे गेटच्याबाबतीत पूर्णत: सुरक्षित होणार आहे.
रेल्वेत पाण्याचा पुनर्वापर
By admin | Published: June 02, 2016 12:43 AM