मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून ९ ऑगस्ट रोजी पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.पश्चिम महाराष्ट्राला झोडपणाऱ्या पावसाने मुंबईत मात्र किंचित विश्रांती घेतली आहे. गुरुवारी तुरळक ठिकाणी कोसळलेल्या सरी वगळता पावसाने दिवसभर मुंबईकडे पाठच फिरवली होती. दरम्यान, ९ ऑगस्ट रोजी मुंबईत हलक्या सरी कोसळतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. तर नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील.
पुणे, सातारा, कोल्हापूरला पावसाचा आज रेड अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 3:16 AM