शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

विमानतळाच्या निविदेला लालफितीचा विळखा

By admin | Published: June 08, 2017 6:31 AM

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचा ठेका जी.व्ही.के. कंपनीला देण्यात आला आहे

कमलाकर कांबळे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई: आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचा ठेका जी.व्ही.के. कंपनीला देण्यात आला आहे. परंतु चार महिने झाले तरी या निविदेला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळालेली नाही. निविदेला पडलेल्या लालफितीच्या विळख्यामुळे विमानतळाचे टेक आॅफ लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे सिडकोने गावांच्या स्थलांतरासह विमानतळपूर्व कामांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. आवश्यक असलेल्या पर्यावरणविषयक मंजुरीही प्राप्त झाल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. दहा गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे. चार महिन्यांपूर्वी विमानतळ उभारणीच्या कामासाठी जीव्हीकेची निविदा या प्रकल्पाच्या उभारणीसाठी ग्राह्य धरण्यात आली आहे. परंतु त्यावर राज्य मंत्रिमंडळाची मोहोर लागणे शिल्लक राहिले आहे. मंत्रिमंडळाची मान्यता न मिळाल्याने विमानतळ उभारणीचे काम रखडले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डिसेंबर २0१९ मध्ये विमानाचे पहिले टेकआॅफ होईल, असा दावा राज्य सरकारने केला आहे. त्याअनुषंगाने सिडकोने विमानतळपूर्व कामांना गती दिली आहे. या कामांसाठी सुमारे २000 कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत. यात उलवा टेकडीची उंची कमी करणे, जमिनीचे सपाटीकरण, उलवे नदीचा प्रवाह बदलणे, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या स्थलांतरित करणे आदी कामांचा समावेश आहे. या कामांना काही स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे ही कामे पूर्ण करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे.एकूणच विमानतळाचा पहिला टप्पा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. परंतु राज्य मंत्रिमंडळाकडून ठेकेदार निवडीच्या निविदेला मंजुरी मिळण्यास विलंब होत असल्याने सिडकोची कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीतही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाचे पहिले उड्डाण निर्धारित कालावधीतच होईल, असा दावा सिडकोकडून केला जात आहे.>सिडकोचे सकारात्मक प्रयत्ननवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्धारित वेळेतच पूर्ण होईल, असा ठाम विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना वाटतो आहे. त्या दृष्टीने त्यांनी कंबर कसली आहे. स्थलांतरित होणाऱ्या गावांच्या पुनर्वसनासह विमानतळपूर्व कामांवर त्यांनी भर दिला.२000 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पपूर्व कामांना गती देण्यात आली आहे. या कामांत कोणताही अडथळा निर्माण होवू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. एकूणच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळताच विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना आखल्या जात आहेत.