राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यात जुलै-आॅगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी आणि आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने शेती उद्ध्वस्त झालीच; मात्र दूध व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. राज्याच्या दूध संकलनात दैनंदिन २५ लाख लिटरची घट झाली असून सहा महिन्यांपूर्वी गायीचे दूध अतिरिक्त म्हणून नाकारणाऱ्या दूध संघांना आता दूध उत्पादकांच्या दारात जावे लागत आहे.
राज्यात रोज सुमारे दोन कोटी १० लाख लिटर दूध संकलन होते. यापैकी एक कोटी २५ लाख लिटर दुधाचे सहकारी व खासगी संघ संकलन करतात. दूध संकलनात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर हे जिल्हे इतरांच्या तुलनेत आघाडीवर आहेत. महाराष्टÑातील ऋतू आणि हवामान पाहिले तर आॅक्टोबरपासून दुधाचा पुष्ठकाळ सुरू होतो. जानेवारीपर्यंत दूध वाढत जाते आणि त्यानंतर उन्हाळा वाढू लागली की दूध कमी होत जाते. यंदा मात्र डिसेंबर निम्मा झाला तरी पुष्ठकाळ सुरू झालेला दिसत नाही. सरासरी रोजच्या संकलनात २५ ते ३० लाख लिटरची घट दिसत आहे. मध्यंतरी गाय व म्हशीचे दूध वाढले होते. म्हशीच्या दुधाला मागणी राहिली. मात्र एका-एका संघाकडे लाखो लिटर गाईचे दूध अतिरिक्त झाल्याने त्यांनी दूधच नाकारले. काही दूध संघांनी पाण्यापेक्षा कमी दराने दूध खरेदी केल्याने दूध उत्पादकांनी या व्यवसायाकडे पाठ फिरवली. त्याचा परिणामही संकलन घटण्यावर झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.गाय दूध खरेदी दर ३१ रुपयांवरगायीच्या दुधापासून पावडर व बटर तयार केले जाते. मात्र सध्या गायीचे दूध संकलन कमालीचे घसरल्याने पुणे, अहमदनगर, आदी जिल्ह्यांत अनेक खासगी संघ ३१ रुपये लिटरने दूध खरेदी करीत आहेत.ही आहेत प्रमुख कारणे :च्अतिवृष्टी, महापुरामुळे पश्चिम महाराष्टÑात चाराटंचाईच्महापुरात हजारो दुभती जनावरे वाहून गेली.च्परतीच्या पावसाने पुन्हा चाºयाचा प्रश्न गंभीर.च्अनेक संघांनी दूध नाकारले.च्पाण्यापेक्षा कमी दराने दूधखरेदी केले.अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे दूध उत्पादनाला फटका बसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत संकलनात खूप घट झाली आहे. अशीच स्थिती राहिली तर आगामी काळात दुधाची टंचाई भासू शकते.- गोपाळराव मस्के, अध्यक्ष, महाराष्टÑ राज्य दूध प्रक्रिया कल्याणकारी संस्था