महेश सरनाईक ।
रिफायनरी एक सुवर्णसंधी - भाग १रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-नाणार येथे होऊ घातलेल्या भारतातील सर्वात मोठ्या रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल्स प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या मनात असलेले समज-गैरसमज दूर करण्याच्यादृष्टीने रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल्स कंपनीच्यावतीने नाणारवासीय ग्रामस्थ, पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी आणि अधिकारी यांचा संयुक्त अभ्यास दौरा हरियाणा राज्यातील पानिपत रिफायनरी येथे पार पडला. या अभ्यासात प्रत्यक्ष पाहणीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘रिफायनरी एक सुवर्णसंधी’ अशी मालिका देत आहोत.सिंधुदुर्ग : आपल्या देशाला २0२५ सालापर्यंत साधारपणपणे १५0 मिली मेट्रीक टन पेट्रोलियम पदार्थांची गरज भासणार आहे. त्यातील ६0 मिली मेट्रीक टन पेट्रोलियम इंधन बनविण्यासाठी नाणार येथे रिफायनरी प्रकल्पाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे देशाला लागणाऱ्या इंधन निर्मितीमधील एक तृतीयांश इंधन निर्मिती होणार असल्याने कोकणाने जसे आजपर्यंत विविध पातळीवर राज्यासह, देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे तशीच काहीशी संधी नाणार रिफायनरी प्रकल्पातून मिळणार आहे.
रिफायनरी प्रकल्प होताना प्रामुख्याने त्याचे दोन भागात रूपांतर होणार आहे. त्यातील एक भाग आहे पेट्रोलियम पदार्थापासून इंधन निर्मिती. तर दुसरा भाग आहे पेट्रोकेमिकल्स म्हणजे इतर उद्योगांना लागणारी साधनसामुग्री. त्यातील पहिला भाग म्हणजे पेट्रोलियम पदार्थ. रिफायनरी प्रकल्पाची निर्मिती होताना पेट्रोलियम पदार्थ हा तिचा भाग अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. पेट्रोलियम पदार्थ निर्मितीमध्ये इंधन म्हणून वापर करणारे पेट्रोल, डिझेल, रेल्वेसाठीचे इंधन डिझेल, जहाजामध्ये लागणारे इंधन तसेच विमानांसाठी लागणारे एटीएफ (एव्हीएशन टर्बाईन फ्ल्यूएल), वीज निर्मितीसाठी नाफ्ता, बॉयलरसाठीचा नाफ्ता आदींची निर्मिती करण्यात येणार आहे.
त्याचबरोबरीने एल.पी.जी (घरगुती गॅस) तयार होणार आहे. केंद्रशासनाच्या उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत देशभरात ९ कोटी घरांना घरगुती गॅस पुरविण्याचा मानस आहे. गेल्या चार वर्षांत ३ कोटी घरांना याची पूर्तता झाली आहे. त्यामुळे अजूनही ६ कोटी घरांना हा गॅस तातडीने देण्याची गरज आहे. याचा अर्थ ६ कोटी घरांमध्ये अद्यापही लाकडाचे सरपण वापरले जाते. या सरपणासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. या प्रकल्पातून गॅसची निर्मिती करताना आपण सध्या सुरू असलेली वृक्षतोडही थांबवू शकणार आहोत.
युरो ६ इंधनाची होणार निर्मितीभारताप्रमाणेच जगभरात सर्वच ठिकाणी युरो ४ मानांकनाचे इंधन वापरले जाते. युरो ३ मध्ये १५० टक्के कार्बनचे प्रमाण पकडल्यास युरो ६ मध्ये ते प्रमाण १0 टक्क्यांवर येणार आहे. रिफायनरीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार युरो ६ मानांकनाच्या इंधनाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणावर रोख लावला जाईल. त्यामुळे भारतात होणारे प्रदूषण व जागतिक तापमान वाढ रोखण्यासही मदत होणार आहे. कारण युरो ६ च्या पेट्रोलियम उत्पादनातून हवेत मिसळणाºया आणि प्रदूषणाला धोका पोहोचविणाºया कार्बनचे विसर्जन फार कमी प्रमाणात होणार आहे.
(क्रमश:) (पुढील भागात उद्योगधंद्यांच्या हबची होणार निर्मिती)
जलमार्ग फायदेशीरया प्रकल्पासाठी लागणारे क्रूड आॅईल सौदी अरेबियाकडून मिळणार आहे. यासाठी सागरी मार्गाचा वापर होणार आहे. त्यामुळे विजयदुर्ग बंदराचा विकास होणार असून यातून या जेटीला आणि तेथील आजूबाजूच्या परिसरातील लोकांना मोठा रोजगार प्राप्त होणार आहे.
हरियाणा राज्यातील पानिपत रिफायनरीच्या अभ्यास दौऱ्यासाठी शेतकरी, बागायदार, पत्रकार, मिडिया प्रतिनीधी यांची टीम.