विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जलयुक्त शिवार अभियान सिंचनाची यशकथा ठरली आहे. शेतीला सिंचनाची व्यवस्था होण्यासाठी भविष्यात राज्यातील नदी, तलाव, कालवे या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अभियान हाती घ्यावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात शेती पुरस्कार २०१४ चा वितरण समारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित होते. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. पुरस्कारार्थी शेतकरी हे राज्य शासनाचे कृषीदूतच आहेत. त्यांनी राज्यभर दौरे करुन शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या प्रयोगांबाबत मार्गदर्शन करावे असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. राज्य सरकारने ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली असली तरी भविष्यातील लक्ष्य हे कर्जमुक्तीचे आहे, असे ते म्हणाले. भाजीपाला उत्पादकांना देऊन गौरविण्यात येईल, असे कृषी मंत्री फुंडकर यांनी जाहीर केले. यावेळी लोकमतचे वार्ताहर व्ही. एस. कुलकर्णी यांना शेती मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यात कृषी विद्यापीठांपेक्षा शेतकऱ्यांनीच विविध प्रयोग व संशोधन करून उत्पादनात वाढ केल्याचा चिमटा कुलपती असलेल्या राज्यपालांनी यावेळी काढला.
नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे राज्यपालांचे आवाहन
By admin | Published: July 12, 2017 4:23 AM