शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शिवसेनेचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवा- नितेश राणे

By admin | Published: June 15, 2017 4:29 PM

काँग्रेस नेते आणि आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे नाव नोंदवण्याची मागणी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 15 -  काँग्रेस नेते आणि आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे नाव नोंदवण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकारचं समर्थन परत घेणार असल्याच्या पोकळ धमक्या देणा-या शिवसेनेच्या नावे रेकॉर्ड नोंदवला गेला पाहिजे, असं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला चिठ्ठी लिहून नितेश राणेंनी कळवलं आहे. नितेश राणे म्हणाले, मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून एक रेकॉर्ड रजिस्टर करू इच्छितो, शिवसेनेनं ब-याचदा भाजपा सरकारचं समर्थन परत घेण्याच्या पोकळ धमक्या दिल्या आहेत. गिनीज बुकात नोंद होणारा हा पहिलाच अशा प्रकारचा विक्रम असेल. माझ्या या पत्रालाच नोंदणीसाठीचा अर्ज समजण्यात यावे, असे नितेश राणेंनी पत्रामध्ये नमूद केले आहे. नितेश राणे टीका करत म्हणाले की, शिवसेनेसाठी हा एक वेगळा रेकॉर्ड असेल. नितेश राणे हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी नितेश राणे यांचे वडील गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत होते. शिवसेनेच्या 1996च्या सत्ता काळात नारायण राणेंनी महसूल मंत्री आणि मुख्यमंत्रीपदासारखी महत्त्वाची खाती सांभाळली होती. गेल्या काही दिवसापूर्वी नारायण राणे काँग्रेसमध्ये नाराज असल्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होते. मात्र, नारायण राणे यांच्या सर्व मागण्या भाजपकडून पूर्ण होत नाहीत. त्यामुळे राणे भाजप प्रवेशाचा निर्णय घेत नाहीत, असे समजले होते. मात्र नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. ते भाजपामध्ये आल्यास भाजपमध्ये पुन्हा दोन गट पडतील व निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांना डावलून काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना जिल्ह्यातील महत्त्वाची पदे मिळतील, अशी भीती भाजप पदाधिकाऱ्यांना वाटत असल्यामुळे भाजपा पदाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाला विरोध केला होता. मात्र नारायण राणे यांनी आपला ठाम निर्णय अजूनही घेतला नसून ते 25 एप्रिलला निर्णय जाहीर करतील, अशी चर्चा होती