मुंबई : मुंबई विमानतळानजीक असलेल्या झोपड्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने त्यांचे सर्वेक्षण लवकरात लवकर करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. या विमानतळानजीक असलेल्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली येथे बैठक झाली. या बैठकीला खा. पूनम महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी राज्य शासन, महापालिका, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण, एमएमआरडीए आदींचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, झोपडपट्ट्या सध्या ज्या जमिनीवर वसल्या आहेत, तेथेच १०० एकर जागेवर पुनर्वसन करण्यात येईल. संदेशनगर, इंदिरानगर, सेवकनगर या झोपडपट्ट्यांमधील ६३४१ झोपड्यांचे सर्वेक्षण झाले आहे. त्यातील संदेशनगरचा आराखडा प्रसिद्ध झाला असून, प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)
विमानतळाजवळील झोपड्यांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2016 4:38 AM