-आरोपींच्या कोठडीत वाढ
मुंबई : शीना बोराच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इंद्राणी मुखर्जीने महाराष्ट्रातील विविध जागांची पाहणी केली होती. त्यानंतर तिने यासाठी रायगडची निवड केली. रायगडची निवड करण्यामागे इंद्राणीचा हेतू काय होता? गागोदे खिंड निर्जन होती म्हणून की आणखी काही? याचा तपास करायचा आहे, असे खार पोलिसांनी शनिवारी वांद्रे न्यायालयाला सांगितले. त्यानुसार न्यायालयाने इंद्राणीसह संजीव खन्ना, श्याम राय या तिघांच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली. या तिघांची कोठडी संपत असल्याने पोलिसांनी त्यांना वांद्रे अतिरिक्त महानगर दंडाधिकारी एस.एम. चंदगडे यांच्यासमोर हजर केले. त्यांच्या कोठडीत वाढ करावी, अशी मागणी सरकारी वकील लक्ष्मण राठोड यांनी केली. इंद्राणी तपासात सहकार्य करीत नसल्याचेही त्यांनी सांगितले.