अमरावती : गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘पॅनकार्ड क्बल’च्या संचालकाविरुद्ध आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेला २६४ जणांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणी अटकेत असलेल्या संचालकांनी स्थानिक न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. मात्र मंगळवारी विशेष एमपीआयडी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.अब्दुल फारूख शेख जफर यांनी ११ आॅक्टोबर २०१६ रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात क्लबविरोधात पहिली तक्रार नोंदविली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारींचा ओघ वाढला. क्लबमध्ये पैसे भरल्यास सहा वर्षे तीन महिन्यांत दुप्पट पैसे मिळण्याचे एजंटकडून तक्रारकर्त्याला सांगण्यात आले होते. मात्र, त्यानुसार गुंतवणूकदारांना मोबदला मिळाला नव्हता. या प्रकरणात पोलिसांनी गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून संचालक शोभा रत्नाकर बरडे (रा. बोरीवली, मुंबई), सुधीर शंकर मोरर्व्हेकर (रा. प्रभादेवी,मुंबई), उषा अरुण तारी (रा. माहीम, मुंबई), मनीष कालिदास गांधी (रा. ठाणे), चंद्रसेन गणपत भोसे (रा. सापन) व रामचंद्रन रामकृष्णन (रा. मालाड, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)
‘पॅनकार्ड’ प्रकरणातील जामीन फेटाळला
By admin | Published: March 09, 2017 1:45 AM