नाशिक : शिकवणीसाठी ‘त्या’ दोघी नऊ वर्षांच्या जुळ्या बहीणी गुरूवारी संध्याकाळी घराबाहेर पडल्या...रस्त्यातील एका विठ्ठल मंदिरात खेळण्यासाठी रमल्या...शिकवणीची वेळ कधी सरली हे त्यांच्याही लक्षात आले नाही...जेव्हा लक्षात आले तेव्हा त्या घाबरल्या...शिकवणीला गेलो नाही म्हणून आई मारणार या भीतीने त्यांनी ‘आयडिया’ लढवून चार दिवसांपुर्वी ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं...’ मालिकेत दाखविण्यात आलेल्या सीनवरून त्यांनी अपहरण झाल्याचा बनाव केल्याचे पोलिसांना मुलींनी दिलेल्या कबुलीमधून समोर आले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिडको परिसरातील रहिवासी असलेल्या नऊ वर्षांच्या दोघी जुळ्या बहिणी नेहमीप्रमाणे खासगी शिकवणीसाठी घराबाहेर पडल्या... शिकवणीला दांडी मारत परिसरातील मंदिरातच रमल्या आणि अखेरपर्यंत शिकवणीसाठी पोहचल्या नाहीत. जेव्हा त्या घरी पोहचल्या तेव्हा त्यांनी अपहरणाची ‘आपबिती’ची आयडिया सांगितली. त्यांचे शब्द ऐकून आई-वडिलांच्या पायाखालील जमीन सरकली. त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठले आणि घडला प्रकार कथन केला. घडलेला प्रकार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी गंभीरपणे घेत तत्काळ पालक व मुलींना घेऊन घटनास्थळ गाठले. तेव्हा त्या मुलींना एक अनोळखी घर दाखवून या घरातच आम्हाला कोंडून ठेवले होते, असे सांगितले. यावेळी पोलिसांच्या पथकाने संशयित घराजवळ जाऊन पाहणी केली असता मुली खोट्या बोलत असून, ते बनाव करीत असल्याचे लक्षात आले. त्यांनी दोघी मुलींना वाहनातून आई-वडिलांसोबत पोलीस ठाण्यात आणले. यावेळी कड यांनी प्रेमाने त्यांच्याशी स्वतंत्र संवाद साधला असता शिकवणीला दांडी मारली त्यामुळे आई मारेल, या भीतीने अशा पद्धतीचा खोटा बनाव केल्याचे सांगितले.
‘ये रिश्ता क्या कहलाता...’ मधून बोध घेतला अन् नऊ वर्षांच्या जुळ्या बहिणींनी केला अपहरणाचा बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 10:33 PM
शिकवणीसाठी घराबाहेर पडल्या... शिकवणीला दांडी मारत परिसरातील मंदिरातच रमल्या आणि अखेरपर्यंत शिकवणीसाठी पोहचल्या नाहीत. जेव्हा त्या घरी पोहचल्या तेव्हा त्यांनी अपहरणाची ‘आपबिती’ची आयडिया सांगितली. त्यांचे शब्द ऐकून आई-वडिलांच्या पायाखालील जमीन सरकली.
ठळक मुद्देतत्काळ पालक व मुलींना घेऊन घटनास्थळ गाठले. शिकवणीला दांडी मारली त्यामुळे आई मारेल, या भीतीने अशा पद्धतीचा खोटा बनाव केल्याचे सांगितले.शिकवणीला दांडी मारत परिसरातील मंदिरातच रमल्या आणि अखेरपर्यंत शिकवणीसाठी पोहचल्या नाहीत