ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २३ - गत आठवड्यात वाळूज येथे अतिक्रमणाच्या वादातुन पेटवून घेतलेल्या एका ५० वर्षीय इसमाचा गुरुवारी उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यु झाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आरोपीविरुध्द कारवाई करण्यात यावी, यासाठी त्यांचा मृतदेह पोलिस ठाण्यात घेऊन आले होते. या प्रकरणी पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढत ७ आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात केला. त्यानंतर तणाव निवळला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ जून रोजी उत्तम बंडु भंडारी (५० रा.लायननगर, वाळूज) हे घराशेजारी शौचालयाचे बांधकाम करीत होते. दरम्यान, बांधकाम सुरु असतांना त्यांच्या घराशेजारील सुभाष सोनवणे, कुसुम सोनवणे, किशोर नाडे, आशाबाई चव्हाण, रेखा रोडे, उज्जवला डोंगरजाळ व कल्पना म्हस्के यांनी उत्तम भंडारी यांच्याशी वाद घालत बांधकाम थांबविण्यासाठी दबाव आणला होता. हा वाद सुरु असतांना उत्तम भंडारी यांनी शेजाºयांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी भंडारी यांनी शेजाºयांना अगोदर सोनवणे या इसमाने अतिक्रमण करुन घर बांधले असून त्याचे अतिक्रमण काढा नंतर माझे अतिक्रमण काढतो असे सांगितले होते. शेजाºयांनी विनाकारण वाद उकरुन भांडण केल्यामुळे अपमानित झालेल्या उत्तम भंडारी यांनी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरी पेटवून घेतले होते. त्यांचा आरडा-ओरडा ऐकून त्याची पत्नी ताराबाई व सुन नंदीनी भंडारे यांनी उत्तम भंडारी यांच्या कपडल्या लागलेली आग विझवुन त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेत उत्तम भंडारी हे ४० टक्के भाजले होते. शासकीय रुग्णालयात त्यांनी शेजाºयाबरोबर झालेल्या वादातुन आपण पेटवून घेतल्याचा जबाब दिला होता.
उपचारादरम्यान आज मृत्यू
शासकीय रुग्णालयात उत्तम भंडारी यांच्यावर उपचार सुरु असतांना आज गुरुवारी पहाटे ५.१५ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे नातेवाईकांना चांगलाच धक्का बसला. दुर्दैवी घटनेत उत्तम भंडारी यांचा मृत्यु झाल्याची वार्ता वाळूजला पसरताच गावात तणावाचे वातावरण पसरले होते. या घटनेस जबाबदार असणाºया आरोपीविरुध्द कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा शव विच्छेदन होऊ देणार नाही, असा पवित्रा भंडारी यांच्या नातेवाईकांनी घेतला होता.
मृतदेह पोलिस ठाण्यात
शव विच्छेदन झाल्यानंतर उत्तम भंडारी याचा मृतदेह ठेवण्यात आलेली रुग्णवाहिका संतप्त नातेवाईकांनी वाळूज पोलिस ठाण्यात आणली होती. यावेळी पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी मयताच्या नातेवाईकांची समजुत काढुन आरोपीविरुध्द कडक कारवाई करण्याचे तसेच तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यामुळे नातेवाईकांनी नरमाईची भुमिका स्विकारत त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास मयत उत्तम भंडारी यांच्यावर पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
चौघा आरोपींना अटक
उत्तम भंडारी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांची पत्नी ताराबाई भंडारी यांच्या तक्रारीवरुन आरोपी सुभाष सोनवणे, कुसुम सोनवणे, किशोर नाडे, आशाबाई चव्हाण, रेखा रोडे, उज्जवला डोंगरजाळ व कल्पना म्हस्के यांच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुभाष सोनवणे, किशोर नाडे, रेखा रोडे, उज्जवला डोंगरजाळ या चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार उपेंद्र कुतुर हे करीत आहेत.