मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मंडळाने जाहीर केलेल्या वेळपत्रकानुसार दहावीची परीक्षा मंगळवार, ७ मार्चला सुरू होणार असून बुधवार, १ एप्रिलला संपणार आहे. तर, बारावीची परीक्षा मंगळवार, २८ फेब्रुवारीला सुरू होऊन शनिवार, २५ मार्चला संपणार आहे. मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते तेव्हा सामाजिक शास्त्रे आणि विज्ञानाचे पेपर सलग दिवशी ठेवण्यात आले होते. २० मार्चला विज्ञान, २१ मार्चला सामाजिक शास्त्रे १ आणि २२ मार्चला सामाजिक शास्त्रे २ असे पेपर ठेवण्यात आले होते. सलग पेपर ठेवल्याने पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी याला विरोध केला होता. त्यानुसार मंडळाने परीक्षा वेळापत्रकात बदल केला आहे.
दहावीच्या जाहीर झालेल्या नवीन वेळापत्रकानुसार शनिवार १८ मार्चला विज्ञान १, सोमवार २० मार्चला विज्ञान २, बुधवार २२ मार्चला सामाजिकशास्त्रे १ आणि शनिवार २५ मार्चला सामाजिक शास्त्रे २ असे पेपर ठेवण्यात आले आहेत. दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक https://mahahsscboard.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर सविस्तर उपलब्ध आहे. दहावी आणि बारावीच्या प्रत्येक पेपरमध्ये एक दिवस विद्यार्थ्यांना मिळणार आहे.