ऑनलाइन लोकमत
येवला, दि. २१ - माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांची तुरूंगातून सुटका व्हावी, यासाठी तालुक्यातील अंगुलगाव येथील ५१ जोडप्यांनी नागेश्वराला साकडे घालत होम हवन केले. बहुजनाचा पोशिंदा आमदार छगन भुजबळ आहे अशी भावना नागेश्वराजवळ व्यक्त करीत त्यांची तुरूंगातून सुटका व्हावी अशी प्रार्थना केली. यावेळी ज्ञानेश्वर जगझाप,सुभाष जगझाप,दीपक जेजुरकर,बाळू जगझाप, सुदाम बटवल,यांचेसह ग्रामस्थांनी ही प्रार्थना केली. बारामतीनंतर येवला हे विकासाचं मॉडेल बनावं यासाठी भुजबळांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद, पर्यटनमंत्री, आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातलं ज्येष्ठत्व, सारी ताकद पणाला लावली. त्यातून येवल्याचा बदललेला चेहरा सर्वांच्या पुढ्यात असल्याची भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.