शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

रिलायन्सची खोदकामाची परवानगी रद्द

By admin | Published: December 23, 2014 12:36 AM

शहरात ‘४ जी’ची लाईन टाकण्यासाठी रिलायसन्सने रस्ते खोदणे सुरू केले आहे. त्यामुळे अनेकांच्या घराला जोडलेली जलवाहिनी व वीज कनेक्शनची केबल तुटली आहे. रिलायन्सने गडर लाईनमध्येच

काँग्रेसच्या घेरावानंतर आयुक्तांचे आदेश : गडर लाईन, नळ जोडण्या तोडल्या नागपूर : शहरात ‘४ जी’ची लाईन टाकण्यासाठी रिलायसन्सने रस्ते खोदणे सुरू केले आहे. त्यामुळे अनेकांच्या घराला जोडलेली जलवाहिनी व वीज कनेक्शनची केबल तुटली आहे. रिलायन्सने गडर लाईनमध्येच पाईप टाकल्याने गडर चोक झाले आहेत. याची गंभीर दखल घेत काँग्रेसने आयुक्त श्याम वर्धने यांना घेराव घातला. रिलायन्सला दिलेली परवानगी रद्द करून त्यांच्याकडून नुकसीनाबाबत भुर्दंड वसूल करण्याची मागणी करण्यात आली. याची दखल घेत आयुक्त वर्धने यांनी रिलायन्सला दिलेली परवानगी रद्द करण्याचे आदेश हॉटमिक्स विभागाला दिले. महापालिकेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात नगरसेवक, काँग्रेस पदाधिकारी व नागरिक सोमवारी महापालिकेत धडकले. रिलायन्सवर कारवाई करा व ओसीडब्ल्यूकडून नागरिकांना पाठविण्यात येणाऱ्या अवास्तव बिलांची चौकशी करण्याची मागणी करीत आयुक्तांना घेराव घातला. आयुक्तांनी रिलायन्सचे अधिकारी मल्लिकार्जुन पाटील, सचदेव नेमा यांच्यासह ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. यावेळी विकास ठाकरे यांनी या अधिकाऱ्यांसमक्ष आयुक्तांना सांगितले की, रिलायन्सने ‘४ जी’ लाईन टाकण्यासाठी जयताळा रोडवरील सुर्वेनगर परिसरात केबल डक्ट टाकण्यासाठी खोदकाम केले आहे. डांबरी रस्ते, सिमेंट रस्तेही खोदण्यात आले असून, ते पुन्हा दुरुस्त न करता तसेच सोडून दिले आहेत. डक्टच्या माध्यमातून केबल टाकताना बऱ्याच नागरिकांचे नळ जोडणीचे व वीज कनेक्शनचे केबल तुटले आहेत. याशिवाय केबलचे पाईप गडरलाईनमध्ये टाकण्यात आल्यामुळे गडर चोक झाले आहेत. गडरचे पाणी शौचालय, बाथरूममध्ये साचत आहे.नागरिकांनी याची तक्रार करूनही रिलायन्सने दखल घेतली नाही. शेवटी महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संबंधित डक्ट जेसीबीने खोदून काढण्यात आले असता, गडरच्या आतमधून केबलचे पाईप टाकण्यात आल्याचे उघडकीस आले. रिलायन्सचे अधिकारी महापालिकेलाही जुमानत नसल्याचे सांगत, संबंधित गडर दुरुस्तीवर येणारा खर्च रिलायन्सकडून वसूल करावा व हॉटमिक्स विभागाने केबल टाकण्यासाठी दिलेली परवानगी रद्द करावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली. याची दखल घेत आयुक्त वर्धने यांनी रिलायन्सला दिलेली परवानगी रद्द करण्याचे आदेश दिले. सोबत यानंतर अशा परवानगी देताना संबंधित भागातील नगरसेवक, वॉर्ड अधिकारी व अभियंता यांचे मत घेतले जावे, अशा सूचनाही त्यांनी हॉटमिक्स विभागाला दिल्या. आंदोलकांमध्ये प्रशांत धवड, रेखा बाराहाते. प्रेरणा कापसे, निमिषा शिर्के, सरस्वती सलामे, संजय महाकाळकर, अमान खान, गुड्डू तिवारी, अतुल कोटेचा, राजू व्यास, कमलेश समर्थ, गजराज हटेवार, बंडोपंत टेंभूर्णे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)ओसीडब्ल्यूच्या वाढीव बिलाची तपासणी कराओसीडब्ल्यूचे अधिकारी जलवाहिनी नसलेल्या भागातही टँकरने पाणीपुरवठा करीत नाही. नगरसेवकांच्या मागणीची दखल न घेता उलट त्यांच्यावर खोटे आरोप करून गुन्हे दाखल केले जात आहेत. या प्रकारांना आळा घालून नगरसेविका कैकाडे यांच्या पतीवर ओसीडब्ल्यूने दाखल केलेली तक्रार मागे घेण्याची मागणी ठाकरे यांनी केली. सोबतच नागरिकांना अवास्तव बिल पाठवून नंतर ते कमी करण्यासाठी पैसे उकळण्याचा प्रकार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर आयुक्त वर्धने यांनी पाणी बिलाची शहनिशा करण्याचे तसेच कैकाडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घेण्याचे निर्देश ओसीडब्ल्यूला दिले.