शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

रिलायन्स, टाटासाठी दरनिश्चिती

By admin | Published: October 22, 2016 1:40 AM

नेहमीच शॉक देणाऱ्या वीज कंपन्यांना महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने दणका दिल्याने त्यांनी वीजदर कपात केली आहे. वीजदरवाढीसाठी आयोगाकडे कंपन्यांनी प्रस्ताव

मुंबई : नेहमीच शॉक देणाऱ्या वीज कंपन्यांना महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने दणका दिल्याने त्यांनी वीजदर कपात केली आहे. वीजदरवाढीसाठी आयोगाकडे कंपन्यांनी प्रस्ताव दाखल केल्यानंतर २१ आॅक्टोबर रोजी आयोगाने याबाबत निर्णय दिला. त्यानुसार १०० युनिटपर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. १ आॅक्टोबरपासून आयोगाने लागू केलेले वीजदर आकारले जाणार आहेत. २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षांकरिता आयोगाने वीजदर निश्चित केला आहे. आयोगाने रेल्वे, मेट्रो आणि मोनोरेल या सर्वांचे वीजदर एकत्रित केले आहेत. आयोगाने सार्वजनिक पाणीपुरवठा योजना आणि सांडपाणी व मलनि:सारण प्रकल्प नावाचा एक नवा वर्ग निर्माण केला आहे. या वर्गात सरासरी आकारणीचा दर हा वीजपुरवठ्याच्या सरासरी खर्चापेक्षा कमी असणार आहे.रिलायन्सने चालू आर्थिक वर्ष २०१६-१७करिता सरासरी वीजदरात प्रस्तावित केलेल्या ६ टक्के वाढीऐवजी आयोगाने १.९३ टक्के कपात मंजूर केली आहे. २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या आर्थिक वर्षांमध्येदेखील आयोगाने सरासरी वीजदर अनुक्रमे ०.७६, १.०६, १५.१३ टक्क्यांनी कमी केला आहे. रिलायन्सने या वर्षांसाठी वीजदरांमध्ये ३ टक्के वार्षिक वाढ मागितली होती. टाटाने आर्थिक वर्ष २०१६-१७करिता सरासरी वीजदरात मागितलेल्या १७ टक्के कपातीऐवजी आयोगाने १.८५ टक्के वाढ मंजूर केली आहे. २०१७-१८, २०१८-१९ या आर्थिक वर्षांत आयोगाने अनुक्रमे सरासरी वीजदर २.२६ आणि २.५१ टक्के वाढविला आहे. २०१९-२०मध्ये सरासरी वीजदर १४.९३ टक्क्यांनी कमी केला आहे. टाटाने २०१७-१८ आणि २०१८-१९करिता ६ आणि २ टक्के वाढ व २०१९-२०करिता २ टक्के कपातीची मागणी केली होती. (प्रतिनिधी)असे आहेत नवे वीजदरटाटाचे वीजदर (२०१६-१७साठी)युनिटवीजदर१०१-३००५.१७३०१-५००९.५७५००११.८४१०१-३००७.६५३०१-५००९.०९५००१०.९८