- सोपान पांढरीपांडे, नागपूर
उद्योगपती मुकेश अंबानींच्या रिलायन्स समूहातील ‘रिलायन्स जिओ’ ही कंपनी बहुप्रतीक्षित ४-जी सेलफोन सेवा येत्या दोन महिन्यांत देशभर सादर करणार आहे, अशी माहिती कंपनी निकटवर्तीय सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या जन्मदिनी म्हणजे २८ डिसेंबरला टप्याटप्याने ४-जी सेवा सादर करण्याचे कंपनीने ठरविले होते. पण ४-जीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा वेळेत तयार न झाल्याने कंपनीला ही योजना पुढे ढकलावी लागली.एकाच यंत्रात फोन, टीव्ही व बँकसुद्धासूत्रांच्या महितीनुसार, रिलायन्स जिओची ४-जी सेवा केवळ ‘हायस्पीड डेटा सर्व्हिस’ राहणार नसून कंपनी त्याचबरोबर यासाठी लागणारे सेलफोनही बाजारात आणणार आहे. छऋ (उच्चार लाईफ) असे नाव असलेल्या या अँड्राईड फोनमध्ये रिलायन्स जिओ स्वत:चे ‘अॅप्स’ही देणार आहे. या सेलफोनमध्ये हाय डेफिनेशन लाईव्ह टीव्ही असेल व डेटा स्टोरेजचा ताण मेमरीवर येऊ नये म्हणून जिओने स्वत:चे व्हर्चुअल क्लाऊडसुद्धा तयार केले आहे.या सेलफोनमध्ये ग्राहकांना आॅनलाईन बिल पेमेंट, ई-वॉलेट, ई-मनी शिवाय डेटा ट्रान्सफर मेडिकल टेस्टचे रिपोर्टसुद्धा सेव्ह करता येतील. ४-जी सेवा किती वेगळी याचे उदाहरण म्हणजे - समजा टीव्ही बघत असताना सिरीयल पाहताना १० मिनिटे उशीर झाल्यास मागच्या १० मिनिटांत काय दाखवले गेले तेही पाहता येईल. अशाप्रकारे सात दिवसांपूर्वीचे टीव्ही कार्यक्रम बघता येतील. रिलायन्स जिओच्या वैशिष्ट्यपूर्ण सेवेमुळे ग्राहकांचे संपूर्ण आयुष्यच ‘डिजिटल’ होईल. लाईफ सेलफोनचे सर्वात उन्नत मॉडेल १००० रुपयांत उपलब्ध आहे; तर सध्या तयार होत असलेले टॅरीफ प्लॅन्स ३-जीपेक्षा महाग नसतील, अशी माहितीही सूत्रांनी दिली.मौद्यामध्ये ‘इंटरनेट डेटा सेंटर’ संपूर्ण देशभर ४-जी सेवा पुरविण्यासाठी रिलायन्स जिओ अनेक भागात इंटरनेट डेटा सेंटर्स (आयडीसी) स्थापन करणार आहे. त्यापैकी एक नागपूरजवळच्या मौदा या गावात पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. सर्व ग्राहकांचे फोन या सेंटरमध्ये येतात व तिथून ते गंतव्याकडे पाठविले जातात. सेकंदाच्या दशांश भागात हे सर्व घडते.