मुंबई : मुंबईतील १९९३च्या हरी मशीद गोळीबार प्रकरणी सीबीआयने पोलिसांना दिलेल्या क्लीन चिटवर शंका उपस्थित करण्याइतपत न्यायालयाकडे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत, असे म्हणत विशेष सीबीआय दंडाधिकाऱ्यांनी सीबीआयने केस बंद करण्यासाठी दाखल केलेला अहवाल स्वीकारला. याचाच अर्थ हरी मशीद प्रकरणी आरोपी असलेल्या पोलिसांवरील केस बंद करण्यात आली आहे. या केसमधील मूळ तक्रारदार फारुकी मापकर २०११-१२मध्ये न्यायालयापुढे हजर झाला. त्याला त्याची तक्रार लिखित स्वरूपात देण्याची परवानगी देण्यात आली होती. लिखित अर्ज देण्यासाठी वारंवार परवानगी देऊनही मापकरने अर्ज केला नाही, असे निरीक्षण विशेष सीबीआय दंडाधिकारी लक्ष्मीकांत बिडवई यांनी केस बंद करताना नोंदवले.‘ही केस पाच वर्षे जुनी आहे आणि या टप्प्यावर तपास अधिकारी प्रमोद कुमार मांझी यांनी केस बंद करण्यासाठी दाखल केलेल्या अहवालावर शंका उपस्थित करण्याजोगे ठोस पुरावे न्यायालयाकडे नाहीत. त्याशिवाय तक्रारदाराला चार- पाच वर्षे संधी देऊनही त्याने लिखित अर्ज दिला नाही. त्यामुळे ही केस पुढे चालविण्यात काहीही अर्थ नाही,’ असे निरीक्षण दंडाधिकाऱ्यांनी नोंदवले. (प्रतिनिधी)२०१२ मध्ये भापकरचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने दंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले नाही. ही सगळी परिस्थिती लक्षात घेत सीबीआयने दाखल केलेल्या अहवाल स्वीकारण्यात येत आहे, असे न्या. बिडवई यांनी स्पष्ट केले.
हरी मशीद प्रकरणी पोलिसांना दिलासा
By admin | Published: September 04, 2016 1:39 AM