शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
2
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
3
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
4
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
5
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
6
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
7
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
8
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
9
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
10
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
11
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
12
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
13
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
14
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
15
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
16
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
17
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
18
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
19
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!

दुष्काळग्रस्तांना दिलासा! १७८ तालुक्यांतील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 11:30 AM

केंद्राच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, ७५० मिमीपेक्षा कमी पाऊस, असा निकष लक्षात घेऊन ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. 

मुंबई : राज्यातील केवळ ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्यामुळे सरकारवर होणारी टीका लक्षात घेता, दुष्काळाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४० तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित १७८ तालुक्यातील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.मंत्रालयातील वॉर रूममध्ये मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक गुरुवारी झाली. यात हा निर्णय घेण्यात आला. उपसमितीचे सदस्य तथा सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री विखे-पाटील, अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे, बैठकीला उपस्थित होते. केंद्राच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, ७५० मिमीपेक्षा कमी पाऊस, असा निकष लक्षात घेऊन ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. 

 या सवलती मिळणार दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसूलात घट, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषिपंपांच्या वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीजजोडणी खंडित न करणे 

 पशुधनासाठी मूरघास राज्यात पशुधनाकरिता चारा निर्माण होण्याकरिता एक लाख लाभार्थी शेतकऱ्यांना पाच लाख टन मूरघास निर्मिती करून वितरण करण्यात येणार आहे. यासाठी ३० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रdroughtदुष्काळ