लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्यातील उर्वरित थकीत रक्कम जूनमध्ये त्यांना देण्यात येणार आहे. तीन महिन्यांचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या जूनमधील पगारात देण्याचे आदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत. तर, विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वाढीमुळे एसटी महामंडळावर सुमारे १८ कोटींची बोजा पडणार असल्याची माहिती एसटीच्या सुत्रांनी दिली. राज्य शासनाने १ जानेवारी २०१६ पासून मूळ वेतनावर ६ टक्के महागाई भत्त्यात वाढ केली. यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११९ वरुन १२५ टक्के करण्यात आला आहे. जानेवारी २०१६ ते आॅगस्ट २०१६ या कालावधीतील महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात उपयोगी पडेल, अशा स्वरुपात देण्याचे आदेश रावते यांनी दिले होते. त्यानुसार जानेवारी व फेबुवारी महिन्यातील वाढ गेल्या वर्षी गणेशोत्सवापूर्वी आणि उर्वरित सहा महिन्यांची वाढ दिवाळीपूर्वी देण्यात आली. उर्वरित तीन महिन्यांची रक्कम जून २०१७ च्या पगारात देण्यात येईल.
एसटी कर्मचाऱ्यांना उर्वरित भत्ता जूनमध्ये
By admin | Published: May 25, 2017 2:13 AM