मुंबई : दुष्काळात होरपळलेल्या मराठवाड्याची पिण्याच्या पाण्याच्या टंचाईतून कायमस्वरूपी मुक्तता करण्यासाठी गावे व शहरांना बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करणारी वॉटर ग्रीड योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी त्यासाठी पाठपुरावा केला आहे. लोणीकर यांनी रविवारी तेलंगण राज्याचा दौरा करून ४२ हजार कोटी रुपये खर्चाच्या ‘मिशन भगीरथ’ या तेलंगण वॉटर ग्रीड प्रकल्पाची पाहणी केली. तेलंगण राज्य शासनामार्फत हैदराबाद येथे सादरीकरण करून लोणीकर यांना प्रकल्पाची माहिती देण्यात आली. लोणीकर म्हणाले की, मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या कामाला मंत्रिमंडळाने तत्त्वत: मान्यता दिली असून, सहा महिन्यांत डीपीआर तयार करून कामाला सुरु वात केली जाणार आहे. गुजरातधील वॉटर ग्रीडची माहिती घेण्यासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व आपण स्वत: तज्ज्ञांना घेऊन काही दिवसांपूर्वी दौरा केला, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मराठवाड्यातील टंचाईवर ‘वॉटर ग्रीड’चा उपाय
By admin | Published: September 12, 2016 4:12 AM