मुंबई - महाराष्ट्रातील रेमडेसिवीरच्या तुटवड्यासंदर्भात आता मुंबई उच्च न्यायालयानेही (bombay high court) दखल घेतली आहे. यासंदर्भात न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने, राज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन कोणत्या आधारे वाटले जात आहे? असा सवाल केंद्र सरकारला केला आहे. तसेच, एकट्या महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत 40टक्क्यांहून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे त्यांना रेमडेसिवीरदेखाल त्याच प्रमाणात मिळायला हवे, असे न्यायालयाने म्हटले आहे. (Remedisivir injections distribution parameters bombay high court to Narendra Modi government)
यासंदर्भात, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारलाही फटकारले आहे. जिल्ह्यांना योग्य पद्धतीने रेमडेसिवीरचे वाटप होत नाही, असे म्हणत, राज्य सरकारने 13 एप्रिल आणि 18 एप्रिलला नागपूरात रेमडेसिवीरची एकही कुपी का पाठवण्यात आली नाही? असा सवालही केला आहे.
देश सोडून चिनी कोरोना लस घेण्यासाठी नेपाळमध्ये का जातायत लोक? उत्तर वाचून व्हाल अवाक!
न्यायालयाने म्हटले आहे, की आम्ही FDA (फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन)च्या जॉइंट डायरेक्टरसोबत बैठक केली. त्यांनी सांगितले, की राज्य पातळीवर एक समिती आहे. ही समिती राज्यांसाठी कुप्यांची संख्या निश्चित करते. सध्या 7 कंपन्या देशात रेमेडेसिविर औषधाचा पुरवठा करत आहे. परिस्थिती पाहता, जेथे कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे, अशा शहरांना कंपन्यांनी अधिक रेमडेसिवीर द्यायला हव्या. यात नागपूरचाही समावेश आहे. यासाठी सरकार कंपन्यांना निर्देश देऊ शकते.
महाराष्ट्रात दर तीन मिनिटाला एका रुग्णाचा मृत्यू - महाराष्ट्रात दर तासाला जवळपास 2,859 जणांना कोरोनाची लागण होत आहे. तर प्रत्येक तीन मिनिटांना एकाचा मृत्यू होत आहे. एवढेच नाही, तर राज्यातील एकूण मृतांचा आकडाही 60 हजारच्या वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत येथे 503 जणांचा मृत्यू झाला.
CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!
'या' देशांपेक्षाही अधिक नवे कोरोनाबाधित एकट्या महाराष्ट्रात -महाराष्ट्र - 68,631टर्की - 55,802अमेरिका - 43,174ब्राझील - 42,937फ्रान्स - 29,344