शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

वनविभागाची अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली

By admin | Published: October 20, 2014 11:17 PM

दोन लाख हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण; केवळ २७ हजार हेक्टरवर कारवाई!

नीलेश शहाकार/बुलडाणा गत तीन वर्षात वनजमिनींवरील अतिक्रमण राज्यात झपाट्याने वाढले असून, त्या तुलनेत वन विभागाकडून अतिक्रमणे हटविण्याची कारवाई मंदावल्याने अतिक्रमकांचे फावले आहे. वनहक्क कायद्याचा फायदा लाटण्यासाठी वनजमीन बळकावणार्‍या टोळ्या राज्यात कार्यरत झाल्या असून, त्यामुळे वनजमिनीवरील अतिक्रमण २ लाख २४ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत जंगलवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम २00६ च्या अंतर्गत आदिवासींना कसण्यासाठी वनजमीन उपलब्ध करून देण्याचे धोरण शासनाकडून आखण्यात आले; मात्र याचा गैरफायदा घेत, वनजमिनींवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण वाढले. दुसरीकडे वनहक्क कायद्यांतर्गत केलेल्या कारवायांचे दावे तपासण्याची कारवाई क्षेत्र पातळीवर संथगतीने सुरू असल्याने त्याचा परिणाम अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईवर झाला. त्यामुळे वनजमिनीवरील अतिक्रमण फोफावले.वन विभागाच्या आकडेवारीनुसार, २0११-१२ साली ८४ हजार हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण होते. त्याच वर्षी ३ हजार ३६९ हेक्टरवर पुन्हा अतिक्रमण वाढले. हे प्रमाण झपाट्याने वाढून, यावर्षी तब्बल १६ हजार हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण करण्यात आले. २0१३-१४ साली ५ हजार १५२ हेक्टर क्षेत्रात नव्याने अतिक्रमण करण्यात आले. अतिक्रमणाचे क्षेत्र वाढत असताना अतिक्रमणे काढण्याची गती मात्र अतिशय कमी आहे. सध्या वनजमिनींवरील अतिक्रमणाचे क्षेत्र २ लाख २४ हजार १८३ हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. *राज्यातील वनजमिनीवर झालेले अतिक्रमण (हेक्टरमध्ये)वर्ष           अतिक्रमण         हटविलेले               शिल्लक२0११-१२   ८८१४२.३८0    १९२९.१८0         ८६२१३.२00२0१२-१३   ८७८२९.५३९    १७७४९.३९३       ७00८0.१४५२0१३-१४   ७५२३२.७९९     ७३४२.४१८         ६७८९0.३८१