मुंबई : मुंबई महापालिकेतील प्रत्येक विभागात भ्रष्टाचार सुरू आहे. महापालिकेतील गैरव्यवहारांकडे लक्ष जाऊ नये, म्हणूनच शिवसेनेकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. महापालिकेतील कोट्यवधींच्या भ्रष्टाचारास जबाबदार असणाऱ्या शिवसेनेची मान्यता काढून घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली. शिवसेना व भाजपातील कलगीतुरा मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाला घातक आहे. महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवूनच ही खेळी केली जात आहे. गेली दोन दशके महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. पालिकेतील प्रत्येक विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. महापालिकेला कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या शिवसेनेची मान्यता काढून घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर यांनी केली. त्यासाठी आता थेट पंतप्रधान कार्यालयानेच हस्तक्षेप करावा, असेही पावसकर म्हणाले.चांगल्या कारभारासाठी जनतेने शिवसेना-भाजपाला सत्ता दिली आहे. मात्र, दोन्ही पक्षांत सध्या केवळ टीकेचे राजकारण सुरू आहे. रोज एकमेकांची उणीदुणी काढण्याचेच काम सुरू आहे. युतीतील भांडणामुळे लोकांचा सरकार व व्यवस्थेवरील विश्वास उडाल्याचा आरोप पावसकर यांनी केला.
शिवसेनेची मान्यता काढून घ्या! - पावसकर
By admin | Published: June 28, 2016 3:24 AM