मुंबई : डॉक्टरने लिहिलेले प्रिस्क्रिप्शन वाचता येत नाही, काहीवेळा फार्मासिस्टना डॉक्टरांचे अक्षर न कळल्यामुळे चुकीचे औषध दिल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबरीने डॉक्टर महागड्या औषधाचे नाव लिहिल्याने रुग्णांची फसवणूक होते, अशा सर्व आरोपांना चोख उत्तर देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सर्व डॉक्टरांना पत्र पाठवले आहे. डॉक्टरांनी औषध लिहून देताना औषधाचे जेनरिक नाव लिहून द्यावे. औषधाच्या ब्रॅण्डचा उल्लेख करू नये. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या प्रिस्क्रिप्शन आराखड्यानुसारच प्रिस्क्रिप्शन द्यावे आणि औषधांची नावे कॅपिटल अक्षरांत लिहावीत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. देशभरातील डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन देण्याची पद्धत, लिहिण्याची पद्धत सारखीच राहावी, या हेतूने हे पत्र सर्व फिजिशियन्सना पाठवण्यात आल्याचे आयएमएचे म्हणणे आहे. आयएमएने घेतलेल्या या निर्णयावर सर्वसामान्य आपली मते नोंदवू शकतात. त्यांना प्रिस्क्रिप्शनमध्ये कोणते बदल हवे आहेत, याविषयी ते मत मांडू शकतात. याचबरोबरीने त्यांच्या सूचना त्यांनी आयएमएकडे येथे ंं’्र.१्र९५्र@ल्ल्रू.्रल्ल १७ आॅगस्ट पर्यंत पाठवाव्यात.
प्रिस्क्रिप्शनवर कॅपिटल अक्षरे काढा - आयएमए
By admin | Published: July 30, 2015 2:46 AM