पुणे : अर्थव्यवस्थेसंदर्भातल्या अनेक बैठकांना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी निर्मला सितारामन यांना बाेलवले नाही. अर्थ मंत्रालयाच्या बैठका पंतप्रधान घेत आहेत. अर्थमंत्र्याला बैठकांना न बाेलवणे हा त्यांचा अपमान आहे. त्यामुळे निर्मला सितारामन यांचे काम समाधानकारक नसेल तर त्यांना त्यांच्या पदावरुन दूर करण्यात यावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. या परिषदेत चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धाेरणांवर जाेरदार टीका केली. चव्हाण म्हणाले, 1 फेब्रुवारीला मोदी सरकारचा अर्थ संकल्प मांडला जाईल. देशाची आर्थिक स्थिती पाहता हा महत्वाचा आहे. या अर्थसंकल्पात महत्वाचे निर्णय घेतले गेले नाही तर सध्याच्या मंदीमध्ये बदल होईल असे वाटत नाही.
शिवसेनेने दिलेल्या प्रस्थावाच्या वक्तव्यावर मी ठाम : पृथ्वीराज चव्हाण
अर्थ मंत्रालयाच्या बैठका अर्थमंत्री नाहीतर पंतप्रधान घेत आहेत. या बैठकीला अर्थमंत्र्यांना निमंत्रण दिले जात नाही. पंतप्रधानांनी मोठ्या व्यावसायिकांना बोलवले त्या बैठकीला अर्थमंत्री नव्हत्या. अर्थ मंत्रालयाच्या 15 बैठक झाल्या त्यातल्या अनेक बैठकांना निर्मला सीतारामन यांना बोलावले नाही. अर्थ मंत्रालयाची सर्व सूत्रे पंतप्रधानांनी आपल्या हाती घेतली आहेत. संसदेत बजेट काेण सादर करेल हाही एक प्रश्न आहे. सीतारामन यांनी जरी बजेट सादर केले तरी ते बजेट माेदींचे बजेट असेल.
नाईट लाईफचा प्रयाेग मुंबईत यशस्वी झाल तर पुण्यात मुंबईकरीता नाईट लाईफचे धाेरण राबविण्याचा विचार पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे करत आहेत. हा प्रयाेग सुरुवातीला मुंबईतील काही भागांमध्ये राबविण्यात येईल. तेथे ताे यशस्वी झाल्यास पुण्याचा विचार करु असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.