शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
4
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
5
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
6
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
7
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
8
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
9
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
10
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
11
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
12
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
13
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
14
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
15
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
16
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
17
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
19
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
20
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही

पोलिसांची चौकशी प्रकरणे निकाली काढा

By admin | Published: July 30, 2015 2:44 AM

पोलिसांवरील प्रलंबित विभागीय चौकशीची (डीई) प्रकरणे तातडीने निकालात काढण्याच्या सूचना गृह विभागाने पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांना दिल्या आहेत.

- जमीर काझी,  मुंबई पोलिसांवरील प्रलंबित विभागीय चौकशीची (डीई) प्रकरणे तातडीने निकालात काढण्याच्या सूचना गृह विभागाने पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांना दिल्या आहेत. प्रलंबित ‘डीई’मुळे राज्यातील २० हजारांवर पोलिसांच्या वेतनश्रेणीतील वाढ व पदोन्नती रखडलेली आहे. आता नव्या आदेशामुळे गेल्या ३० एप्रिलला दोन वर्षे पूर्ण झालेल्या व त्यापूर्वीची प्रकरणे पुढील वर्षाच्या ३१ मार्चपूर्वी निकालात काढण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. पोलीस शिपाई ते निरीक्षक दर्जाच्या कर्मचारी /अधिकाऱ्यापर्यंतच्या प्रकरणांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.दोन लाखांवर कुमक असलेल्या राज्य पोलीस दलात नियमांचा भंग करणाऱ्या, अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी तसेच आलेल्या तक्रार अर्जांच्या अनुषंगाने किंवा कर्तव्यात कामचुकारपणा केल्याच्या कारणावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाते. निलंबन किंवा सक्तीच्या रजेवर पाठवत असताना खातेनिहाय विभागीय चौकशीचे आदेश दिले जातात. सर्वसाधारण विभागीय चौकशी एक ते सव्वा वर्षात पूर्ण करावी, अशी तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा नियम व अटीच्या कलमामध्ये आहे. मात्र ज्या अधिकाऱ्यांकडून विभागीय चौकशी व्हायची आहे, त्याने केलेले दुर्लक्ष, त्याची अन्यत्र बदली होणे आणि अन्य प्रशासकीय कारणांमुळे होणाऱ्या विलंबामुळे अनेक वेळा मुदत उलटून जाते. संबंधित पोलीस कर्मचारी/अधिकारी निलंबनाबाबत मॅट किंवा उच्च न्यायालयात धाव घेऊन पुन्हा सेवेत येतो. बहुतांशवेळा मुदतीमध्ये चौकशी पूर्ण न झाल्यामुळे त्यांच्या बाजूने निकाल लागतो. त्यामुळे असे पोलीस/अधिकारी सेवेत आले, तरी त्यांच्यावरील विभागीय चौकशी पूर्ण झाली नसल्याने त्यांना दरवर्षी दिली जाणारी वेतनश्रेणीतील वाढ, तफावत आणि पदोन्नतीमध्ये डावलले जाते. त्याचप्रमाणे अनेक वेळा जाणीवपूर्वक सातत्याने ‘साइड’ नेमणूक दिली जाते.अशी अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्याने तसेच त्याबाबत दरवर्षी दिल्या जाणाऱ्या निर्धारित नमुन्यातील माहितीही बरेचवेळा अपुरी व चुकीची असल्याचे गृह सचिव के.पी.बक्षी यांनी घेतलेल्या आढाव्यात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोन वर्षे किंवा त्यापूर्वीची प्रलंबित विभागीय चौकशीची प्रकरणे त्वरित निकाली काढली जावीत, असे आदेश पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत. २० हजार प्रलंबित प्रकरणेगृह विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पोलिसांची सुमारे २० हजारांवर प्रलंबित विभागीय चौकशीची प्रकरणे विविध कारणांमुळे रखडली आहेत. त्याचा फटका संबंधितांना बसत असतानाच दुसरीकडे निलंबित प्रकरणांमुळे अनेकांना घरबसल्या वेतन द्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांची प्रकरणे तातडीने निकालात काढण्यात येणार आहेत.सूचना दिल्या, अहवाल मागवलाशासनाच्या सूचनेनुसार प्रलंबित विभागीय चौकशीची प्रकरणे निकालात काढण्याबाबत सर्व पोलीस आयुक्त / अधीक्षकांना सूचना केल्या आहेत. त्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवालही त्यांच्याकडून मागविण्यात आलेला आहे. - संजीव दयाळ, पोलीस महासंचालक