शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

विदेशी कर्जाबाबत श्वेतपत्रिका काढा

By admin | Published: June 13, 2017 2:26 AM

देशावरील विदेशी कर्जासंदर्भात श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी करणारी रिट याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशावरील विदेशी कर्जासंदर्भात श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी करणारी रिट याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. याचिकेत पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव व वित्त सचिव यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. सुनील मिश्रा यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेतील माहितीनुसार, केंद्र शासनावर मोठ्या प्रमाणात विदेशी कर्ज आहे. मिश्रा यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत देशावरील विदेशी कर्जाची माहिती मागितली होती. तसेच, याविषयी पंतप्रधान व वित्त सचिवांना वेळोवेळी निवेदने सादर केली होती. परंतु, त्यांना आवश्यक माहिती देण्यात आली नाही. देशात २०१२ मध्ये दरडोई १४ हजार ६९९ रुपये विदेशी कर्ज होते. हे कर्ज आता वाढून दरडोई १८ हजारांच्या जवळपास पोहोचले आहे. याचिकाकर्त्याने स्वत:ला विदेशी कर्जमुक्त नागरिक घोषित करण्यात यावे आणि यापुढे केंद्र शासनाला विदेशी कर्ज घेण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंतीही न्यायालयाला केली आहे. येत्या काही दिवसांत यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे़ या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़