मनीषा म्हात्रे / मुंबईअंडरवर्ल्डमधील व्हाइट कॉलर इक्बालमामांची प्रेयसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २४ वर्षांच्या राहतने ‘पैसा नही तो तूभी नही...’ या खूनशी वृत्तीने त्याच्यावर सपासप वार करून त्याचा काटा काढल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. इक्बालने राहतला पैसे देणे बंद केले. त्यामुळे त्याला धडा शिकविण्यासाठी तिने हे पाऊल उचलले.मोहम्मद अली रोडवर ७२ वर्षीय इक्बाल राहत होते. पहिल्या पत्नीचे निधन झाले. तिच्यापासून त्यांना दोन मुले आहेत. त्यानंतर त्यांनी सादिकासोबत दुसरा विवाह केला. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर सादिका निघून गेली. सादिकाने घटस्फोट घेऊन दुसऱ्यासोबत विवाह केला. मात्र याच काळात सादिकाची बहीण २४ वर्षांची राहत इक्बाल यांच्या जवळ आली. पत्नीची बहीण असल्यामुळे ते तिचे सर्व हट्ट पुरवत होते. घटस्फोटानंतर सादिकाने राहतच्या अशा वागणुकीमुळे तिला दूर केले. वडिलांच्या निधनानंतर वृद्ध आई आणि ती एकटी पडली. त्यामुळे राहतने इक्बालचा आधार घेतला.इक्बालच्या जिवावर तिची मौज सुरू होती. अशातच राहत आपली फसवणूक करीत असल्याची चाहूल इक्बालला लागली. ते तिला टाळू लागले. मात्र तरीदेखील ती त्यांना भेटण्याचा प्रयत्न करीत असे. अखेर पैसे न दिल्याच्या रागातून तिने त्याचा काटा काढण्याचे ठरविले. राहतने यापूर्वीही केली होती चोरीराहतने २०१०मध्येही इक्बालच्या घरातून सोन्याच्या बांगड्या चोरी केल्या होत्या. ही बाब त्यांच्या बहिणीला समजताच तिने पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून राहतविरुद्ध पायधुनी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा होता. पायधुनीपाठोपाठ घाटकोपर पोलीस ठाण्यातही तिच्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.स्वत:भोवती घातली भिंत : २०१०मध्ये चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राहतने गोवंडी येथील घराला दोन दरवाजे केले. एक दरवाजा ती नेहमी बंद ठेवत असे. त्याला बाहेरून टाळे ठोकलेले असल्यामुळे ती घरात आहे की नाही हे कुणाला समजत नसे. अशात तिने स्वत:ला बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र अशी चोरवाट ठेवली होती. तपास अधिकारी संतोष पिलाने यांनी शिताफिने ही चोरवाट शोधली. व्हाइट कॉलर क्राइम... इक्बाल हा जेनुबाई उर्फ जेनूमावशी उर्फ दारूवाली हिचा मोठा मुलगा होता. इक्बाल यांची मोठी बहीण खतुमा हिचाही एक वेगळाच धाक होता. इक्बाल यांची संपत्ती कोट्यवधीत आहे. ड्रग्स तस्करीत त्यांचे नाव असले तरी दक्षिण मुंबईत ‘इक्बालमामा’ म्हणून त्यांची ओळख होती. सर्वांशी त्यांचे चांगले संबंध होते. गरिबांना ते नेहमीच मदत करत होते.
पैसे देण्यास नकार म्हणून काढला काटा
By admin | Published: January 10, 2017 4:59 AM