शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

रस्ते दुरूस्त करा, अन्यथा टोल बंद

By admin | Published: August 24, 2016 3:09 AM

बांधकामातील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ पालघर येथे सुरू असलेल्या व्यापक उपोषणाची गंभीर दखल सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली

वाडा : मनोर रस्त्यावर शनिवारी रात्री झालेल्या अपघाताची व या रस्त्याच्या बांधकामातील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ पालघर येथे सुरू असलेल्या व्यापक उपोषणाची गंभीर दखल सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून दोन दिवसात रस्ते दुरूस्ती सुरू करा, अन्यथा टोलवसुली बंद करू अशी नोटीस सुप्रीम इन्फ्राला दिली आहे. दोन दिवसांनी शिंदे हे या महामार्गाची स्वत: पाहाणी करणार असून तोपर्यंत खड्डे बुजविले न गेल्यास या रस्त्यावरील टोलवसुली थांबवण्यात येईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. वाडा मनोर रस्त्यावर शनिवारी रात्री खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका दुचाकीला ट्रकने धडक दिल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. याची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकाम) सी. पी. जोशी यांना या रस्त्याचे काम करणाऱ्या सुप्रीम कंपनीला तातडीने नोटिस देऊन दोन दिवसांत रस्ते बुजवण्याचे आदेश देण्याची सूचना केली. आपण स्वत: या कामाची पाहाणी करणार असून त्यावेळी काम समाधानकारक पद्धतीने झाले नसल्याचे आढळल्यास या मार्गावरील टोलवसुली थांबवण्यात येईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला.>टोल थांबविल्याशिवाय सुप्रीम वठणीवर येणार नाहीयाबाबत २२ तारखेपासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की उपोषणाचा प्रारंभ करण्याआधी मी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून संबंधीत सचिवांना हे आदेश काढण्याच्या सूचना दिल्या होत्या जोपर्यंत टोल वसुली थांबविली जात नाही तोपर्यंत हा ठेकेदार कामे पूर्ण करणार नाही. आजवर झालेली जवळपास सव्वा दोनशे आंदोलने यामुळेच असफल ठरली हे दाखवून दिल्याने त्यांनी ही कारवाई केल्याबद्दल त्यांनी शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत.