शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
2
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
3
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
4
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
6
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
7
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
8
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
9
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
10
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
11
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
12
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
14
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
15
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
16
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
17
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
18
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
19
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

सभागृहात गोंधळाचा ‘रिपीट टेलिकास्ट’!

By admin | Published: March 11, 2015 1:35 AM

पालिका महासभेच्या सलग दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांची नाकाबंदी सुरू ठेवली़ थाळीनाद,

मुंबई : पालिका महासभेच्या सलग दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांची नाकाबंदी सुरू ठेवली़ थाळीनाद, घोषणाबाजी करीत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले़ अखेर काँग्रेसच्या त्या गोंधळी नगरसेविकांना महापौरांनी १५ दिवसांसाठी निलंबित केले़ तसेच त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी नगरविकास खात्याकडे धाव घेण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे़ अर्थसंकल्पातील वाढीव तरतुदीतील मोठा निधी शिवसेनेने लाटल्यामुळे विरोधी पक्षांनी सोमवारी सभागृहात गोंधळ घातला़ या प्रकरणी काँग्रेसच्या सहा नगरसेविकांना पालिकेच्या कामकाजातून दिवसभरासाठी निलंबित केले होते़ मात्र पालिका महासभेच्या सलग दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना आज जेरीस आणले़ थाळ्यांचा नाद करीत विरोधी पक्षांनी ‘शिवसेना हाय हाय’ अशी घोषणाबाजी केली़ त्यामुळे हतबल महापौरांनी काही वेळासाठी सभा तहकूब केली़ मात्र सभागृहाच्या दुसऱ्या सत्रातही हा गोंधळ सुरूच राहिला़ गोंधळ आणखी वाढल्यामुळे काँग्रेसच्या सहा नगरसेविकांना १५ दिवसांसाठी सभागृहाच्या कामकाजातून निलंबित केले आहे़ सदस्यत्व रद्द ?काँग्रेसच्या नगरसेविका नयना शेठ, पारुल मेहता, अजंठा यादव, अनिता यादव, वकारुन्नीसा अन्सारी, शीतल म्हात्रे यांना आज पुन्हा १५ दिवसांसाठी निलंबित केले़ तसेच कलम ३८ (१) अंतर्गत गैरवर्तणूक करणाऱ्या या नगरसेविकांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी नगरविकास खात्याकडे करणार असल्याचे महापौरांनी सांगितले़ (प्रतिनिधी)