आयुष्याची सेकंड इनिंग : प्रवासात जमले प्रेम, जीवनसाथी संमेलनात म्हटले ह्यआय लव्ह यूह्ण औरंगाबाद- पहिल्या साथीदाराने साथ सोडल्यामुळे त्यांच्य जीवनात उदासीनता आली होती... उतारत्या वयात भावनिक आधार देणारा नवा जोडदार हवा अशा विचाराने प्रेरित झालेल्या त्या दोघे 'जीवनसाथी' संमेलनात सहभागी होण्यासाठी अहमदाबादहून औरंगाबादेत आले... बस प्रवासातच त्यांचे प्रेम जमले... संमेलनात त्यांनी एकामेकांना ह्यआय लव्ह यूह्ण म्हणत आपले प्रेम व्यक्त केले. आणि उपस्थित ज्येष्ठांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ही काही नवीन चित्रपटाचे कथानक नव्हे तर देशभरात ज्येष्ठ नागरिकांचे लग्न जुळविणाऱ्या अनुबंध फाऊंडेशनद्वारे आयोजित ह्यजीवनसाथी संमेलनातह्ण हा प्रसंग होय. हडकोतील संत सेना भवन येथे जीवनसाथी शोधण्यासाठी वयाची पन्नाशी पार केलेले ५८ पुरुष व १३ स्त्रीया आल्या होत्या. त्यातील ५८ वर्षीय महेश पंड्या व ४९ वर्षीय उषा पटेल यांच्या रेशीमगाठी येथेच जुळल्या. ४८ वयापासून ते ७५ वयापर्यंतचे ज्येष्ठ विवाहइच्छुकांनी आपला परिचय व जीवनसाथी बदलच्या अपेक्षा व्यक्त केल्या. कोणी घटस्फोटीत, कोणी विधवा, कोणी विधूर असलेल्या या ज्येष्ठांमध्ये बहुतांश महिलांनी भावी जोडीदारासोबत 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केली तर उपस्थिती पुरुषांनी भावी जोडीदारासोबत लग्न करण्याचाच निर्णय व्यक्त केला.
अहमदनगर येथे रियल इस्टेट एजंट म्हणून काम करणारे महेश पंड्या व तिथेच ब्युटीपार्लरचा व्यवसाय करणाऱ्या उषा पटेल यांनी उरलेले आयुष्य एकामेकांच्या आधाराने आनंदात जगण्याची शपथ घेतली. पंड्या यांच्या पत्नीचे निधन पाच वर्षापूर्वी झाले तर उषा पटेल यांचा घटस्फोट झाला आहे. दोघेही औरंगाबादेतील ह्यजीवनसाथीह्ण संमेलनात भावीजोडीदार शोधण्यासाठी योगायोगाने बुधवारी अहमदनगर येथून एकाच बस मध्ये बसले व प्रवासात दोघांची ओळख झाली.
आज प्रत्यक्षात संमेलनातच पंड्या यांनी उषा पटेल यांना ह्यआय लव्ह यूह्ण म्हटले व सर्वांच्या साक्षीने रेशीमगाठी जुळल्या. भावी जोडीदाराचा शोध घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या. संमेलनाचे आयोजन अनुबंध फाऊंडेशन, बाबासाहेब शेळके प्रतिष्ठाण, आसरा संस्था, स्वा. सावरकर रुग्ण सेवा व सुश्रुषा मंडळच्या वतीने करण्यात आले होते. -------------------------------ते हार्दिक पंड्याचे मामा... जीवनसाथी संमेलनात ज्या जेष्ठांनी पुर्नविवाहाचा निर्णय घेतला ते महेश पंड्या भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्याचे सख्खे मामा होत. याची माहिती त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली. आता मुल,सूनाच्या सन्मतीने आम्ही लवकरच अहमदाबादेत विवाह करु असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. ------जातीधर्माच्या पलीकडील सोहळाऐरव्ही प्रत्येक जाती,धर्माचे स्वतंत्र वधू-वर संमेलन होत असतात. मात्र, गुरुवारी पार पडले ज्येष्ठ नागरिकांसाठीचे ह्यजीवनसाथीह्ण संमेलन जातीधर्मापलीकडे जाऊन विचार करणारे ठरले. उतरत्या वयात आधार देणारा, जोडीदार असावा, अशी अपेक्षा पुर्नविवाह इच्छुक ज्येष्ठांनी येथे व्यक्त केली. ----वडीलांचे स्थळ घेऊन मुलगा आलारामनगर येथे राहणारा नितेशची आई तीन वर्षापूर्वी निधन झाले. नितेश आता कॉलेजमध्ये शिकत आहे. आपल्या वडीलांच्या पुर्नविवाहसाठी तो आज जीवनसाथी संमेलनात आला होता. वडीलांना योग्य जीवनसाथी मिळावा, यासाठी त्याने वडीलांचा परिचय स्वत: करुन दिला. --------------सन्मानाने वागविणारी पत्नी पाहिजे गंगापूर येथील विलास चव्हाण हे ७५ वर्षीय आजोबा पुर्नविवाहासाठी वॉकर घेऊन आले होते. मला दोन मुले आहेत त्यांची लग्न झाली आहेत. या वयात मायेच्या आधाराची गरज असून मला सन्मानाने वागविणाऱ्या सहचरणी हावी आहे, अश्या अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या. ---------------------कामवासनेसाठी नव्हे तर आधारासाठी लग्नअनुबंध फाऊंडेशनचे नथ्थुभाई पटेल यांनी सांगितले की, ज्येष्ठांना खरा आधार आयुष्याचा उत्तरार्धात लागत असतो. त्यांच्यातील एकाकीपणा दूर करण्यासाठी जीवनसाथीची आवश्यकता असते. यासाठी पन्नाशीपुढील विधवा, विधूर, घटस्फोटीतांचा पुर्नविवाह लावण्याची मोहिम हाती घेतली आहे. हा पुर्नविवाह म्हणजे कामवासनेसाठी नव्हे तर एकामेकांना आधार देण्यासाठी आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संमेलन यशस्वीतेसाठी बाबासाहेब शेळके, राम पातूरकर, लालाभाई पटेल, भारती रावळ, डॉ.लक्ष्मण माने, शिवाजी झांबरे आदींनी परिश्रम घेतले.